gashmeer mahajani instagram
मनोरंजन

'बापाला मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार'; नेटकऱ्यावर चिडला गश्मीर

मुलाची शेंडी खेचली म्हणून गश्मीरवर झाली टीका

स्वाती वेमूल

अभिनेता गश्मीर महाजनीने मराठीसोबतच हिंदी कलाविश्वातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मालिका आणि वेब सीरिजमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रकाशझोतात असलेला गश्मीर आता त्याच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. गश्मीर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तो इन्स्टाग्रामवर मुलासोबतचे फोटो पोस्ट करत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने मुलासोबतचा एक क्युट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. मात्र या फोटोवरून त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली. मुलासोबतच्या फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना गश्मीरने सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचप्रमाणे पूर्ण माहिती नसताना बेजबाबदार कमेंट करू नका, अशा शब्दांत संबंधित नेटकऱ्याला त्याने खडसावलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पांढरं धोतर नसून, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून आणि कपाळावर गंध लावून गश्मीरने त्याच्यासोबत फोटो काढले. यात गश्मीरचा मुलगा व्योमनेही हुबेहूब वडिलांप्रमाणे पोशाख केल्याचं पाहायला मिळतंय. व्योमचं टक्कल केलं असून फोटोत गश्मीर त्याची शेंडी ओढताना दिसतोय. मुलाची शेंडी ओढताना पाहून काही नेटकऱ्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला. काका शेंडी नका ओढू हो, धर्म आहे आपला तो, अशी कमेंट एकाने केली. या नेटकऱ्याला गश्मीरने उत्तर दिलं आहे.

हेही वाचा : 'लॉकडाउन हे काही उत्तर नाही'; ट्रोलिंगनंतरही महेश कोठारे ठाम

गश्मीर महाजनीचं उत्तर

'मुळात ही त्याची शेंडी नाही. तो फक्त दोन वर्षांचा आहे. मुंज झाली नाही. उन्हाळा म्हणून केस कापले आहेत. बापाला आपल्या मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण आपण बहुतेक आपल्या धर्माचे शिलेदार आहात. पण पूर्ण माहिती नसताना बेजबाबदार कमेंट करू नका', असं उत्तर गश्मीरने दिलं. गश्मीरच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT