gashmeer mahajani first reaction after father ravindra mahajani death SAKAL
मनोरंजन

Ravindra Mahajani: योग्य वेळ आली की.. वडील रविंद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीर महाजनीची पहिली प्रतिक्रिया

अखेर रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय

Devendra Jadhav

Gashmeer Mahajani on Ravindra Mahajani Death: मराठी मनोरंजन विश्वात आज धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनींचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. रविंद्र यांचा मृतदेह घरातच होता.

२ दिवसानंतर शेजाऱ्यांना वास आला आणि त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली. शेवटी पोलीसांनी दार तोडल्यावर रविंद्र महाजनी आत मृतावस्थेत आढळले. अखेर रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.

(gashmeer mahajani first reaction after father ravindra mahajani death)

गश्मीर महाजनी सोशल मिडीयावर पोस्ट करुन लिहीतो... ताऱ्याला ताऱ्यासारखंच राहू द्या.. मी आणि माझे कुटूंबीय आम्ही शांतच राहणं पसंत करतोय.

जर माझ्या शांत राहण्याने मला वाईट आणि मानहानी पत्करावी लागत असेल तर इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे याचा मी स्वीकार करतो.. जे गेलेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.

ते माझे वडील होते. माझ्या आईचे पती होते. आणि तुमच्या कोणाही पेक्षा आम्ही त्यांना चांगलं ओळखतो. कदाचित योग्य वेळ आली की मी भविष्यात याविषयी बोलेन. अशी पोस्ट करत गश्मीरने मनातल्या भावना व्यक्त केल्यात

काय आहे रविंद्र महाजनींचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट?

तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांनी अहवाल सांगीतला आहे.. यात ते म्हणतात, पोस्ट मॉर्टम रिपोर्ट च्या प्राथमिक अहवालात रवींद्र महाजनी यांच्या शरीरावर कोणत्याही तीक्ष्ण खुणा अथवा जखमा नसल्याचं समोर आलं आहे.

महाजनी यांचा मृत्यू गुरुवारी १३ जुलै रोजी सकाळी झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रकरणी व्हिसेरा मात्र राखून ठेवण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी राहत्या घरात शुक्रवारी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर जखमा आढळल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू गुरुवारी झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे

रविंद्र महाजनींच निधन कसं झालं?

पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे भाड्याच्या घरात रविंद्र महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह येथील बंद फ्लॅटमध्ये मिळून आला आहे.

मृत्युच्या आधी ७-८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत होते. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT