Gashmeer Mahajani  SAKAL
मनोरंजन

Gashmeer Mahajani: "तुम्ही जबाबदारी घेता का?"वडिलांच्या निधनानंतर टक्कल का नाही केलं या प्रश्नावर गश्मिरचं उत्तर

Vaishali Patil

Gashmeer Mahajani: गश्मिर महाजनी हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केलीय. काही दिवसांपुर्वी गश्मीरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

त्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाले. एकीकडे वडिलांचे निधन झाले आणि दूसरीकडे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ११ जुलैला निधन झाले. त्यानंतर गश्मीर चर्चेत आला. रविंद्र महाजनींच्या अकस्मात निधनाने सर्वांना धक्का बसला.

रविंद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीरला मोठ्या टीकेला तोंड द्यावे लागले. अनेकांनी त्याला ट्रोल केलं. या घटनेला आता जवळपास दोन महिने झाले असले तरी काही लोक गश्मीरला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाही.

आता गश्मीर या धक्क्यातून सावरला आहे. तो त्याच्या कामावर लक्ष केद्रीत करत आहे. आता तो सोशल मीडियावर देखील थोडा सक्रिय झाला आहे. त्याने नुकतच त्याच्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चर्चा केली. यात एका नेचकऱ्यांने त्याला विचारलेल्या प्रश्नाची आणि त्याच्यावर गश्मीरनं दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

एका नेटकऱ्यांने गश्मिरला सवाल केला की, "वडील वारले की केस कापतात यावर काय बोलाल? मला तुमचा दृष्टीकोन ऐकायला आवडेल.."

Gashmeer Mahajani

या प्रश्नावर गश्मिरनं देखील उत्तर दिलं आणि त्याचं उत्तर नेटकऱ्यांना आवडलंही. या प्रश्नाला उत्तर देतांना त्याने लिहिलं की, 'मी जे कार्य करतो त्यावर माझ्या कुटुंबाचं अर्थार्जन होतं. टक्कल केलं असतं तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?’

गश्मीर महाजनी सतत चाहत्यांच्या संपर्कात असतो. गश्मीरला आपण विविध सिनेमा, मालिकांमधुन अभिनय करताना पाहिलंय. टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता याशिवाय मराठी चित्रपटांतून लक्षवेधी भूमिका करुन त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

सोशल मीडियावर आपल्या फोटो, व्हिडिओमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आता गश्मिर पुन्हा एकदा तो ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT