Gauahar Khan Midnight Post Instagram
मनोरंजन

Gauahar Khan: आई बनल्यानंतर अशी झालीय गौहर खानची अवस्था.. मध्यरात्री उशिरा फोटो शेअर करत म्हणाली..

10 मे 2023 रोजी अभिनेत्री गौहर खान हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.

प्रणाली मोरे

Gauahar Khan Midnight Post: बॉलीवूड अभिनेत्री गौहर खान आई बनली आहे. १० मे रोजी तिनं गोंडस मुलाला जन्म दिला. या बातमीनंतर चाहत्यांची स्वारीही खूश आहे. खान कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. आई बनल्यानंतर पाच दिवसांनी अभिनेत्रीनं तिचा पहिला फोटो शेअर केला आणि अभिनेत्रीनं आई बनल्यानंतरचा आपला अनुभवही शेअर केला आहे.

या फोटोमध्ये गौहर खानचा नो मेकअप लूक दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर आई बनल्यानंतरचं तेज मात्र स्पष्ट दिसत आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''रात्रीचे १२ वाजले आहेत,आईच्या नव्या रुपात माझा पहिला मदर्स डे...अर्थात एक दिवस या प्रवासाला झालेला आहे''.(Gauahar Khan: After becoming a mother gauahar khan shared a post at midnight)

गौहर पुढे म्हणाली,''अल्हम्दुलिल्लाह, त्या प्रत्येकासाठी ज्यांनी माझं आईपण खूप खास बनवलं. मला माझ्या कुशीत बाळाला घेण्याचा आनंद उपभोगता येणं हेच अल्लाहचं मोठं गिफ्ट आहे. प्रत्येक वर्षी मी त्या सगळ्या मातांसाठी पोस्ट लिहिली,ज्यांच्यामुळे माझं आयुष्य प्रेरित झालं,पण माझ्यासाठी २०२३ चा मदर्स डे खूप खास राहिला कारण माझ्या आईनं मला मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या''.

Gauahar Khan Post

गौहर खाननं १० मे रोजी मुंबईतील लिलावती रुग्णालयात मुलाला जन्म दिला. अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की ,''मुलगा झाला.. खऱ्याअर्थानं १० मे २०२३ ला आमच्या आयुष्यात आनंद आला. आमच्या मुलाला अन् आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. नवीन नवीन आई-बाबा झालेलो आम्ही आमच्या बाळाच्या येण्यानं खूप आनंदात आहोत''.

२५ डिसेंबर २०२० ला गौहर आणि जैदनं मुंबईच्या आयटीसी ग्रॅंड मराठा हॉटेलमध्ये धूमधडाक्यात निकाह केला होता. गौहर आणि जैदमध्ये १२ वर्षांचं वयाचं अंतर आहे,पण म्हणतात ना प्रेमापुढे वय,धर्म,संपत्ती सगळंच दुय्यम असतं तसंच काहीसं या दोघांच्या बाबतीत झालं. गौहरचा पती जैद एक कोरियोग्राफर आहे. जैद हा प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT