Gauahar Khan Recalls Incident esakal
मनोरंजन

Gauhar Khan : 'बॉलीवूडचा तो प्रसिद्ध अभिनेता हात सोडायला तयारच नव्हता, त्यानं...' गौहरनं सांगितली 'त्या' सुपरस्टारची गोष्ट

रियॅलिटी शो मध्ये गौहर खाननं तिची वेगळी इमेज तयार केली होती. त्यामुळे तिची लोकप्रियताही वाढली होती.

युगंधर ताजणे

Gauahar Khan Recalls Incident: प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान ही नेहमीच तिच्या परखडपणामुळे चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर गौहर खानची वक्तव्यं तिनं घेतलेली भूमिका यामुळे ती लाईमलाईटमध्ये राहिली आहे. आताही गौहर खाननं तिच्याबाबत जे घडलं याविषयी सडेतोडपणे सांगितलं आहे.

रियॅलिटी शो मध्ये गौहर खाननं तिची वेगळी इमेज तयार केली होती. त्यामुळे तिची लोकप्रियताही वाढली होती. सोशल मीडियावर तिचा फॅनबेस या रियॅलिटी शो मुळे कमालीचा वाढला आहे. या सगळ्यात एका वेगळ्या कारणामुळे गौहर खान चर्चेत आली आहे. तिनं बॉलीवूडमधील मोठ्या सुपरस्टारविषयी केलेलं भाष्य अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे.यात गौहरनं त्या अभिनेत्याचे नाव घेतलेलं नाही.मात्र अनेकांना तो अभिनेता कोण आहे हे कळालं आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

गौहरनं तिच्या अभिनयाच्या जोरावर तिची वेगळी ओळख इंडस्ट्रीमध्ये तयार केली. मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री मधून ती प्रेक्षकांसमोर येत राहिली. आणि लाईमलाईटमध्ये तिची चर्चा सुरु झाली. इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी ती एक मॉडेल म्हणून चर्चेत राहिली आहे. एका मुलाखतीमध्ये तिनं म्हटले आहे की, मला त्या सुपरस्टारविषयी खूपच आदर होता. मी त्याला चांगलं मानत होते. मात्र त्या प्रसंगानंतर माझा त्याच्याविषयीची आदर खूपच कमी झाला.

त्या सुपरस्टार अभिनेत्यानं माझ्यासोबत गैरवर्तन केले होते. त्यामुळे मी खूप घाबरुन गेलो होतो. मला त्याच्याकडून अशाप्रकारच्या वर्तनाची अजिबात अपेक्षा नव्हती. संबंधित घटनेनंतर मी स्वताला काही दिवस एका खोलीत बंद करुन घेतले होते. गौहरनं ज्या अभिनेत्याविषयी ती गोष्ट सांगितली होती तो अभिनेता या जगात नसल्याचे तिनं सांगितले आहे. मात्र तिनं त्या अभिनेत्याचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.

ती घटना घडली तेव्हा अभिनेत्री ही १८ वर्षांची होती. मला तेव्हा खूपच भीती वाटून गेली. माझ्या मनातील बॉलीवूड, बॉलीवूडमधील अभिनेते आणि प्रत्यक्षात असणारी परिस्थिती हे सारं वेगळं होतं. मला त्याचा मोठ्या प्रमाणात तोटाही सहन करावा लागला. अभिनेत्रीनं दिलेल्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT