gaurav chopra 
मनोरंजन

अभिनेता गौरव चोप्राला पितृशोक, १० दिवसांपूर्वीच झालं होतं आईचं निधन

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- 'बिग बॉस १०' चा स्पर्धक राहिलेला आणि 'उतरन' या मालिकेतील रघुवेंद्र प्रताप राठोड या भूमिकेने घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव चोप्राच्या आईचं १९ ऑगस्ट रोजी निधन झालं होतं. आणि आता यानंतर १० दिवसांनी त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे. गौरवने सोशल मिडियावर त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली. त्याने एक भावनिक पोस्ट शेअर करत यामध्ये त्याच्या आदर्शांना गमावल्याचं दुःख आणि आणि या कठीण परिस्थितीबाबत लिहिलं आहे. गौरवची आई आणि त्याचे वडिल दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती.

गौरव चोप्राने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, 'श्री स्वतंत्र चोप्रा माझे हिरो. माझे आदर्श, माझी प्रेरणा. मला हे मानायला मला वेळ लागेल की लाखोमध्ये देखील त्यांच्यासारखं कोणी असेल का? मला नाही वाटत. एक आदर्श व्यक्ती, आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, एक असा माणूस जो सगळ्यापेक्षा जास्त कुटुंबाला मानतो. मला हे समजायला २५ वर्ष लागली की सगळेच वडिल त्यांच्यासारखे नसतात. ते खास होते. माझी आई आम्हाला १९ तारखेला सोडून गेली आणि वडिल २९ तारखेला. १० दिवसात ते दोघेही निघून गेले. आयुष्यात एक रितेपण आलं आहे जे कधीच भरुन निघू शकत नाही.' 

याआधी जेव्हा गौरवच्या आईचं निधन झालं होतं तेव्हा देखील त्याने त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. त्याने लिहिलं होतं, 'माझी आई सगळ्यात स्ट्राँग स्त्री होती. पहिला फोटो एक वर्षापूर्वीचा आहे. तीन वर्ष ती कॅन्सरशी लढत राहिली. तीन वर्ष नॉनस्टॉप किमो आणि आम्हाला साथ देणं. प्रत्येक खोली प्रकाशमान करायची. ती एक सुंदर स्त्री होती तिला कोणीही कमजोर करु शकत नव्हतं.तिच्यावर सगळे प्रेम करायचे.'

gaurav chopra father passes away 10 days after the actor lost his mother  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT