Gaurav Taneja's birthday arrest seems to comedian's favourite meme: Thappad se dar nahi lagta biwi.. Google
मनोरंजन

बर्थ डे दिवशी गौरव तनेजाला अटक, म्हणाला,'बीबी के सरप्राइज से डर लगता है..'

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो स्टेशन बाहेर खूप गर्दी जमा केल्या प्रकरणात युट्युबर गौरव तनेजाला शनिवारी नोएडा पोलिसांनी अटक केली होती.

प्रणाली मोरे

आपल्या वाढदिवसा संदर्भात पायलट आणि युट्युबर(Youtuber) गौरव तनेजानं(Gaurav taneja) केलेली एक मजेदार पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने इशाऱ्यातूनच वाढदिवशी झालेल्या आपल्या अटकेसाठी पत्नी रितु राठीला जबाबदार धरलं आहे. गौरव तनेजाच्या या पोस्टवर(Post) लोकं मात्र खूप मजा लुटताना दिसत आहेत.(Gaurav Taneja's birthday arrest seems to comedian's favourite meme: Thappad se dar nahi lagta biwi..)

तनेजाला IPC सेक्शन ३४१ आणि १८८ अंतर्गत शनिवारी ९ जुलै रोजी नोएडा पोलिसांनी अटक केली होती, कारण होतं त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो स्टेशन बाहेर जमा झालेली खूप गर्दी . अर्थात या प्रकरणात तनेजाला त्याच संध्याकाळी सोडूनही देण्यात आलं. आता या घटनेसंदर्भात तनेजा यानं एक ट्वीट केलं आहे.

गौरव तनेजाने ट्वीटवर बर्थ डे हॅशटॅग देत लिहिलं आहे,''थप्पड से डर नहीं लगता साहब...बीवी की सरप्राइज प्लॅनिंग से लगता है... '', त्याच्या या पोस्टवर आतापर्यंत ५५ हजार लोकांनी लाइक दिलं आहे. गौरवच्या पोस्टवर लोक मीम शेअर करत मजा-मस्करी करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं आहे-''ती स्त्री आहे,काहीही करु शकते''. खुप साऱ्या लोकांनी पोस्टवर लाफिंग इमोजी सोबत रिअॅक्ट केलं आहे.

याआधी इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यानं पत्नी संदर्भात एक मीम शेअर केलं होतं. यामध्ये एक व्यक्ती पत्नीसमोर हात जोडून उभा दिसतो,याला फ्लाइंग बीस्ट बोललं गेलं आहे. गर्लफ्रेंडला रितु राठी म्हणून संबोधलं आहे. यामध्ये गर्लफ्रेंड आपल्या पार्टनरला म्हणताना दिसत आहे,'बेबी तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे'.

Gaurav Taneja's birthday arrest seems to comedian's favourite meme

गौरवने आपल्या अटकेसंदर्भात एक निवेदन पत्र देखील आपल्या कुटुंबातर्फे जारी केलं होतं. यामध्ये म्हटलं गेलं होतं-''इथे हे सांगण गरजेचं आहे की माझ्या चाहत्यांनी कुठल्याच प्रकारची हिंसा केली नाही ना गैरवर्तणूक, ना कोणती घोषणाबाजी केली. त्या लोकांनी सार्वजनिक मालमत्तेला देखील काहीच नुकसान पोहोचवलं नाही. तरीदेखील नोएडा पोलिसांनी सेक्शन १८८ आणि ३४१ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आणि म्हणूनच मला अटक केली गेली होती. आणि नंतर काहीच तासांत मला सोडून दिलं. याबाबतील आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत''.

कुटुंबानं दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की,''रितु राठीनं पती गौरव तनेजाला सरप्राइज देण्याच्या हेतूने प्लॅन बनवला होता. ती नोएडाच्या सेक्टर ५१ च्या मेट्रो स्टेशनमधील चार मेट्रो कोचमध्ये बर्थ डे पार्टी होस्ट करणार होती. यासाठी योग्य ती परवानगी घेण्यात आली होती. गौरव तनेजाच्या वाढदिवसासाठी खुप लोकं पोहोचले होते कारण आमच्यासाठी ती लोकं आणि त्यांच्यासाठी आम्ही एका कुटुंबासारखेच आहोत''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT