Aboli serial 
मनोरंजन

अभिनेत्री गौरी कुलकर्णी साकारणार 'अबोली'

नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्वाती वेमूल

स्टार प्रवाह Star Pravah वाहिनीवर लवकरच 'अबोली' Aboli ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची आहे. अभिनेत्री गौरी कुलकर्णी Gauri Kulkarni अबोली ही व्यक्तिरेखा साकारणार असून गौरी ही भूमिका साकारण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे.

या भूमिकेविषयी सांगताना गौरी म्हणाली, "अबोली मालिकेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच स्टार प्रवासोबत काम करतेय याचा आनंद आहे. अबोली ही अतिशय साधी मुलगी आहे. नावाप्रमाणेच अबोल, कमी बोलणारी. तिचं असं वेगळं जग आहे ज्यात ती रमते. खरंतर तिला तिचं म्हणणं मांडायचं असतं मात्र तिला ते मांडू दिलं जात नाही. माझ्यासाठी ही अतिशय आव्हानात्मक भूमिका आहे. कारण मला बोलायला खूप आवडतं. सेटवर माझी अखंड बडबड सुरु असते. अबोली मात्र मितभाषी आहे. त्यामुळे अबोली साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे."

सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. ही नवी मालिका मंगळवार २३ नोव्हेंबरपासून रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robbers Arrested : झुकेगा नही साला…. म्हणणाऱ्यांना अखेर पोलिसांनी झुकवले; तीन गावांत दरोडा घातलेले सहा आरोपी जेरबंद

Latest Marathi News Updates Live: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मिळकत कराबाबत घेतला ऐतिहासिक निर्णय

तुम्हाला, मुख्यमंत्री सहाय्यता निधी हवायं का? ‘या’ २० गंभीर आजारांवरील उपचारासाठी रुग्णाला मिळते आर्थिक मदत, अर्ज कोठे करायचा, कागदपत्रे काय लागतात, वाचा...

Velhe News : वडिलांनी रागवल्याचा राग मनात धरून 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

तेजश्री प्रधानलाही झालेली 'ग'ची बाधा? शशांक केतकरचा अपमान करत मारायची टोमणे, अभिनेत्याने कोर्टात...

SCROLL FOR NEXT