Gautami Deshpande Google
मनोरंजन

गौतमी देशपांडेचं रिलेशनशीपवरनं स्पष्टीकरण!

ती म्हणाली,"तो आणि मी जस्ट फ्रेंड्स!"

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये जशा लिंकअप्सच्या चर्चा रंगतात तसं मराठी सिनेइंडस्ट्रीत अशा गोष्टींचं फार भांडवल केलं जात नाही. एकतर मराठी कलाकार या बातम्या फारच मनावर घेतात आणि लगोलग त्यावर स्पष्टीकरण देऊन मोकळे होतात. निगेटीव्ह पब्लिसिटीतनं मिळणा-या पब्लिसिटीचे त्यांना आधीपासूनच वावडे आहे. असंच सध्या मराठी इंडस्ट्रीत नव्याने आलेली गौतमी देशपांडे आपल्या रीलेशनशीपच्या बाबतीत स्पष्टीकरण देत सुटलीय. गौतमी देशपांडे म्हणतेय,''तो आणि मी जस्ट फ्रेंड्स'' कोण आहे तो? ज्याच्याविषयी गौतमी स्पष्टीकरण देत आहे.

होय,'माझा होशील ना' या झी टी.व्ही वरील मालिकेतनं आपल्या भेटीस आलेली आणि घराघरात ओळखली जाऊ लागलेली गौतमी देशपांडे एक मराठी अभिनयक्षेत्राला मिळालेला आश्वासक चेहरा. त्यात अभिनेत्री मृणमयी देशपांडेची लहान बहिण असल्याकारणाने तिच्याकडनं ब-याच अपेक्षा, आधीपासनंच असलेलं तिच्याभोवतीचं प्रसिद्धीचं वलय याचं तिला असलेलं दडपण. आणि यामुळे आपण जे काही करू त्याचे परिणाम चांगलेच होतील याबाबतीत ती अधिक दक्ष असावी बहुधा. तर ती स्पष्टीकरण देतेय हॅंडसम हंक अभिनेता ललित प्रभाकरविषयी. तर ललितने मात्र अजून तसं उघडपणे का स्पष्ट केलं नाही यावरनं चर्चा रंगलीय.

Lalit Prabhakar

आता जाणूया या 'जस्ट फ्रेंड्स' कहाणीमागे नेमकं दडलंय काय. तर गौतमी देशपांडे आणि ललित प्रभाकर 'जस्ट फ्रेंड्स' या ऑडिओ बूकसाठी एकत्र आलेत. लेखिका सायली केदार आणि गौरी पटवर्धन यांच्या लेखनातनं ही रौमॅंटिक ऑडिओबूक साकारली गेलीय. हा सुपर रोमॅंटिक,चटकदार,खुसखुशीत ऑडिओ ड्रामा गौतमी आणि ललितच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. आपापल्या अभिनयातनं सर्व प्रेक्षकांना वेड लावणारी ही जोडी एका नव्या प्लॅटफॉर्मवर आपल्या आवाजातील अभिनयाची कमाल दाखवायला सज्ज झालीय. मैत्री,मैत्रीतलं नातं,त्यांच्यातील रुसवे -फुगवे आणि प्रेमातील तरलता,त्यासोबत असलेली डिपेन्डन्सी अशा अनेक प्रेमळ नाजूक क्षणांचे सूक्ष्म निरिक्षण करून या व्यक्तिरेखआ खुलवण्यासाठी या जोडगोळीने विशेष मेहनत घेतली आहे. आदिती आणि चिराग या प्रमुख पात्राचं सादरीकरण करताना ललित आणि गौतमी यांच्यातील उत्कठ बॉंडिंग दिसून येते. ते दोघे ही व्यक्तिरेखा पुरेपूर जगले आहेत असे जस्ट फ्रेंड्स स्टोरीटेलवर ऐकताना जाणवेल.

ललित प्रभाकरने आपण कमिटेड नसल्याचं स्पष्ट करताना आपल्याला लग्न करायचे नाही असंही नकळत मागे ब-याचदा स्पष्ट केलं होतं. त्यामुळे गौतमी 'जस्ट फ्रेंड्स' असं स्पष्टिकरण का देतेय यावरनं चर्चा होऊ लागली होती. पण या दोघांचा हा प्रमोशन फंडा होता आणि आता एका नव्या कलाकृतीतनं हे 'जस्ट फ्रेंड्स' म्हणतायत हे कळले तेव्हा ऑडिओबूक मधनं गौतमी आणि ललितची केमिस्ट्री कशी असेल यावर चर्चा होऊ लागलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT