Gautami patil And Sapna Chaudhary Esakal
मनोरंजन

Gautami Patil: 'सपना चौधरी सोबत माझी तुलना...', एकाच वाक्यात गौतमीनं बोलणाऱ्यांचं तोंड केलं बंद

महाराष्ट्रात सध्या गौतमी पाटीलच्या नावाची वादग्रस्त चर्चा सुरु आहे. तिच्या लावणीच्या कार्यक्रमांवरही बंदीची जोरदार मागणी केली जातेय.

प्रणाली मोरे

Gautami Patil: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एका नावानं नुसता दंगा केलाय...अर्थात ते नाव आहे गौतमी पाटील. गौतमी जरी म्हणत असली की मी जो नृत्य प्रकार करते तो लावणी नाहीच मुळी, तरी तिच्या चाहत्यांनी मात्र तिला लावणीसम्राज्ञी ची उपमा जवळपास दिल्यात जमा आहे.

आज गौतमी पाटीलच्या शो ना टाळ्या,शिट्ट्या अन् गर्दीची झुंबड इतकंच घडत नाही तर इथं नाचता नाचता जीवही लोक गमावताना दिसत आहेत.

आणि याच एका कारणानं अचानक गौतमी पाटील विरोधात टोकाचा सूर निघताना दिसतोय आणि अश्लील हावभाव करत लोकांचे जीव घेण्याचा थेट आरोप करत गौतमीच्या शो वर बंदी देखील आणण्याची मागणी केली जात आहे.

यावर प्रतिक्रिया देताना आता गौतमी अनेक मुलाखतीतून म्हणाताना दिसत आहे की, ''मी चुकीचं काही करत नाही,मी मागे हटणार नाही आणि मी धमक्यांनाही घाबरत नाही''. गौतमीची सध्या हरयाणी क्वीन सपना चौधरीसोबत तुलना होताना दिसत आहे.

याविषयी एका वाहिनीच्या मुलाखतीत तिला प्रश्न विचारला असताता ती म्हणाली, ''ताईसोबत माझी तुलना होतेय हे चांगलेच आहे. प्रेक्षक प्रेम दाखवत आहेत ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे''.

गौतमीच्या कार्यक्रमांना बहुतेक वेळा चेंगराचेंगरी होते. असेच एका कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्यानं एका माणसाला जीव गमवावा लागला होता. तसंच, लोक शो दरम्यानं कुठे तरी झाडावर किंवा पत्र्यावर,गॅलरीवर चढतात अन् पडतात..जखमी होतात हे देखील घडताना दिसत आहे.. इतकंच काय तर स्टेजवर चढून लोक धिंगाणा घालताना दिसत आहेत. त्यामुळे गौतमी पाटीलच्या लावण्यांच्या कार्यक्रमावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे.

गौतमी मुळची खरंतर धुळ्याची राहणारी. परिस्थितीमुळे तिला शिक्षण अर्धवट सोडून डान्स शिकायला लागलं आणि कमी वयात काम करणं नशीबी आलं. सुरुवातीला शे-पाचशे रुपयांच्या मानधनावर तिने सुरुवात केली होती. आज ती एका कार्यक्रमासाठी लाखो रुपये आकारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Farmers Protest Escalation : ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्र पेटला! कारखान्यांच्या दारात उभारणार छावण्या; 'या' दिवशी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा मोठा इशारा

Maharashtra Mega Recruitment : तरुणांसाठी मोठी लॉटरी! महसूल विभागात हजारो पदांवर होणार थेट भरती; पाहा दरमहा किती मिळणार मानधन?

Marathi News Live Updates : सातारा पोलीस दलातील ४६ अंमलदारांना दिवाळीच्या तोंडावर पदोन्नतीची भेट; पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा मोठा निर्णय

Rohit Sharma 45 story: हिटमॅनच्या जर्सीवर '४५' नंबर कसा आला? आधी द्रविडचा अडथळा अन् मग आईचा सल्ला आला कामी

Teacher Recruitment : मुलाखतीसह शिक्षक भरतीच्या १० हजार ३२८ जागांवर ११ हजार ४९३ उमेदवारांची शिफारस

SCROLL FOR NEXT