Gautami Patil Esakal
मनोरंजन

Gautami Patil: '...तर मी ऐकून घेणार नाही', गौतमी पाटीलचा घनश्याम दरोडेला इशारा

महाराष्ट्राचा छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडे सातत्याने गौतमीवर टीका करताना दिसुन येत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासुन नृत्यांगना गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिच्या डान्सवरती आणि तिच्या पाटील आडनावावरून ती बरीच चर्चेत आली. काहींनी तिला पाठिंबा दिला तर काहींनी विरोध केला. अशातच गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये म्हणत महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने गौतमीला डिवचलं. त्यानंतर आता दोघांनी एकमेकांना उत्तर देण्यास सुरवात केली आहे.

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान गौतमी पाटीलने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. त्यावेळी गौतमीने प्रतिक्रीया दिली आहे. दिलीप मोहिते यांना आपण आज पहिल्यांदाच भेटलो, त्यांनी कलाकाराची जाण राखली, असंही गौतमीने म्हंटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना गौतमीला महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गौतमीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

गौतमी म्हणाली कि, “मी घनश्यामला एकच सांगते, तू आधी माझ्या कार्यक्रमाला ये. माझा कार्यक्रम बघ. त्यानंतर काही आरोप करायचे असतील तर कर. आधी मला दाखव की मी काय चुकतेय. तू डायरेक्ट माझ्यावर आरोप करशील तर मी सुद्धा ऐकून घेणार नाही. माझी चूक दिसू तर दे. तू आधी कार्यक्रम बघ मग बोल”, अशी शब्दांत गौतमीने घनश्याम दरोडेला सडेतोड उत्तर दिलं आहे.

तर बीडच्या एका शेतकरी पुत्राने गौतमीच्या सगळ्या अटी मान्य करत लग्नाची मागणी घातली आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या घराचा पत्तादेखील दिलाय. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील रोहन गलांडे पाटील या तरुणाने गौतमीला थेट लग्नाची मागणी घातली आहे. पत्रामध्ये त्याने, तुझ्या इच्छा-अटी सगळ्या मान्य, बोल तू होती का माझी परी? असं म्हटलं आहे.

'तू जशी आहेस तशी मला आवडली आहेत. तुझ्यासोबत कुणी लग्न करत नसेल तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मी एक शेतकरी पुत्र असून शेती, दूध सगळं संपन्न आहे. तुझी तयारी असेल तर भेटायला ये' असं पत्रामध्ये रोहन गलांडे पाटील याने म्हटलंय.

त्यावर प्रतिक्रिया देताना गौतमी म्हणाली की,'“माझी सध्या तरी लग्नाची इच्छा नाहीय. मी ज्यावेळेस लग्न करेन त्यावेळी आपल्याला कळवेन”.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT