Gautami Patil
Gautami Patil  esakal
मनोरंजन

Gautami Patil : गौतमीचा कार्यक्रम म्हटल्यावर पोरांना चैन पडेना, कार्यक्रमात धिंगाणा!

युगंधर ताजणे

Gautami Patil Dance Programme : गौतमीचा कार्यक्रम आणि तो शांततेत पार पडला असं चित्र दिसणं कठीण आहे. आतापर्यत गौतमी पाटीलचे जेवढे नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत त्या कार्यक्रमांमध्ये काही ना काही वादाच्या घटना घडल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबत घडलेल्या त्या घटनेनं लक्ष वेधून घेतलं होतं.

सबसे कातील गौतमी पाटीलची गोष्टच वेगळी आहे. जिथं गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम तिथे तरुणाईची मोठी गर्दी दिसून येते. पुणे जिल्ह्यातील कित्येक गावांमधील गौतमीच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि त्याठिकाणी घडलेल्या घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. नृत्याला सुरुवात होण्यापूर्वी गौतमीनं देखील अनेकदा चाहत्यांना शांततेचं आवाहन केलं होतं.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

गौतमीच्या आवाहनाला प्रतिसाद न देता तिच्या नृत्यासोबत स्वता थिरकण्यात गुंग होणाऱ्या तरुणाईच्या सततच्या गोंधळानं मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आताही पारनेर तालुक्यातील जवळे गावात गौतमीच्या झालेल्या नृत्याच्या कार्यक्रमामध्ये तरुणांनी गोंधळ घातल्याचे दिसून आले आहे. गौतमीनं नृत्याला सुरुवात करत काही तरुणांनी मोठ्यानं ओरडत, हातवारे करत, गोंधळ घातल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये वादाचे, राड्याच्या घटना वाढल्या आहेत. यावर गौतमीनं देखील चाहत्यांना शांत राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याची विनंती केली आहे. मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही. एकीकडे गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी आणि काही गावांमध्ये तिचा कार्यक्रम होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणाईच्या उत्साहाला भलतेच उधाण आल्याचे दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT