Gautami Patil Esakal
मनोरंजन

Gautami Patil : गौतमी पाटीलचा कार्यक्रम पडणार महागात, आयोजकांच्या खिशाला लागणार चौपट कात्री

गौतमीला राज्यभरातून मागणी असताना तिचा कार्यक्रम आयोजकांना जवळपास चौपट महागात पडणार आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ, राडा होताना दिसून येतो मात्र राज्यभरातून तिला अफाट मागणी असताना आता मात्र तिचा कार्यक्रम आयोजित करणं आयोजकांना जवळपास चौपट महागात पडणार आहे. आयोजकांसह गौतमी आणि तिच्या चाहत्यांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

गौतमीचा कार्यक्रम आणि चाहत्यांची हुल्लडबाजी, पोलिस, हाणामारी गौतमीच्या कार्यक्रमांच समीकरणच झालं आहे. यात कधी प्रेक्षकांमध्ये हाणामारी होते तर कधी पोलिसांना हुल्लडबाजांवर लाठीचार्ज करतात. अशातच नाशिकमध्ये हुल्लडबाजांचा फटका प्रसारमाध्यमांच्या कॅमेरामॅनलाही बसला. यामुळेच आता पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमांना सर्व परवानग्यासोबत पेड पोलीस बंदोबस्त देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याच पेड बंदोबस्तामुळे आयोजकांच्या खिशाला जवळपास चौपट कात्री लागणार आहे.

पेड पोलीस बंदोबस्ताची सुरुवात सांगोला तालुक्यातील घेरडी या गावातील कार्यक्रमापासून सुरु झाल्याने या आयोजकांना 100 पोलीस कर्मचारी आणि सहा अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी तब्बल सव्वा पाच लाख रुपये भरून गौतमीचा कार्यक्रम ठेवावा लागला असल्याचं समोर आलं आहे.

मात्र यामुळे गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. घेरडी येथे रासपचे नेते आबा मोठे यांच्या वाढदिवसासाठी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. आबा मोठे यांना शुभेच्छा देण्यासाठी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, आता गौतमीच्या मानधनाच्या दुपटीपेक्षाही जास्त रक्कम केवळ पोलीस बंदोबस्तासाठी भरावी लागणार असल्याने सर्वच आयोजकांना एवढा खर्च करणे कितपत शक्य आहे याची जाणीव गौतमीला देखील आहे. त्यामुळेच तुम्ही कार्यक्रमासाठी दुरून येत तर शांतपणे कार्यक्रम पाहा आणि आनंद घ्या गोंधळ करू नका, असं आवाहन गौतमीने आपल्या चाहत्यांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT