Gautami Patil Marathi Lavani Program in Gangapur esakal
मनोरंजन

Gautami Patil : नवरात्रोत्सवात गौतमी पाटीलचा जलवा; कार्यक्रमासाठी पाच हजारावर महिला उपस्थित

अतिउत्साही तरुण गौतमी पाटीलला पाहण्यासाठी व्यापारी गाळ्यावर व झाडावर चढले होते.

सकाळ डिजिटल टीम

गौतमी पाटीलचा कार्यक्रम बघण्यासाठी शहरातील पाच हजारावर महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

गंगापूर : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आणि राडा असं नवं समीकरण तयार होत असतानाच गंगापूर (Gangapur) शहरात सार्वजनिक दुर्गा माता उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम नियोजनबद्ध शांततेत पार पडल्याने शेकडो रसिकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

तरुण वर्गासह महिला मंडळाने मोठ्या संख्येने लावणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे (Navratri Festival) उद्घाटन माजी नगराध्यक्ष फैसल चाउस यांच्या हस्ते झाले. उत्सव समितीच्या अध्यक्ष सुवर्णा जाधव, माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गौतमी पाटीलचा डान्स (Marathi Lavani) सुरू झाल्यानंतर तरुणांनी शिट्ट्या वाजवत आणि 'सबसे कातिल गौतमी पाटील'च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. याशिवाय काही तरुणांनी मंडपातच भन्नाट डान्स करायला सुरुवात केली. त्यामुळं अनेकांनी या मजेशीर कार्यक्रमाचा आनंद लुटला. अतिउत्साही तरुण गौतमी पाटीलला पाहण्यासाठी व्यापारी गळ्यावर व झाडावर चढले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्ध व्यापारी संतोष अंबिलवादे, रामेश्वर नावंदर, सुरेश नेमाडे, संदीप साबणे, सोपान देशमुख, योगेश पाटील, शरद दारुंटे यांनी यशस्वी प्रयत्न केले. संयोजन समितीची अध्यक्षा सुवर्णा जाधव यांनी आभार मानले. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही.

रात्रीचा स्वयंपाक लवकर आटोपून महिलांची हजेरी

गौतमी पाटीलचा कार्यक्रम बघण्यासाठी शहरातील पाच हजारावर महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, सायंकाळी सात वाजता कार्यक्रम असताना महिला मंडळी रात्रीचा स्वयंपाक करूनच घराबाहेर पडल्या. आयोजकातर्फे महिलांना कूपण वाटप केले होते. त्यानुसार सात भाग्यवान महिलांना बक्षिस वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाची व्हिडिओ लिंक देखील व्हायरल करण्यात आली होती. शेकडो प्रेक्षकांनी घरात बसून देखील कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT