gautami patil marathi movie ghungroo release date postponed due to maharashtra politics  SAKAL
मनोरंजन

Gautami Patil Ghungru: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे गौतमीचा सिनेमा अडचणीत, घेतला हा मोठा निर्णय

घुंगरु असं या सिनेमाचं नाव आहे. पण आता या सिनेमाला सध्याच्या राजकीय घडामोडींचा फटका बसलाय.

Devendra Jadhav

Gautami Patil Ghungru News: गौतमी पाटील ही महाराष्ट्रातली चर्चेतलं व्यक्तिमत्व. गौतमी पाटीलचा कार्यक्रम जिथे असेल तिथे अनेकदा राडे झाले आहेत.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी असते, की पोलीसांना लाठीचार्ज करावा लागतो. अशातच गौतमीच्या पहिल्यावहिल्या मराठी सिनेमाची खुप चर्चा आहे.

घुंगरु असं या सिनेमाचं नाव आहे. पण आता या सिनेमाला सध्याच्या राजकीय घडामोडींचा फटका बसलाय.

(gautami patil marathi movie ghungroo release date postponed due to maharashtra politics)

'घुंगरू' चे दिग्दर्शक बाबा गायकवाडांचा खुलासा

बाबा गायकवाड यांनी 'घुंगरू' सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलंय. सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याबाबत बाबा गायकवाड म्हणाले,

"काही कारणाने 'घुंगरू' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत 'घुंगरू' सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात येईल".

दिलखेचक लावणीमुळे चर्चेत असणारी गौतमी घुंगरु निमित्ताने रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. 'घुंगरू' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रातील तमाम फॅन्स या सिनेमाची वाट पाहत आहेत.

घुंगरु या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, माढा, हंपीसह परदेशातही झालं आहे. या सिनेमात ती लेखक - दिग्दर्शक बाबा गायकवाड यांच्यासोबत गौतमीती जोडी जमणार आहे.

गौतमी पाटील हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलचं गाजतंय. लावणी क्वीन म्हणून गौतमी पाटीलची सर्वांना ओळख आहेच. गौतमीच्या नृत्यावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर सुद्धा फॅन्स जीव ओवाळून टाकतात.

घुंगरू सिनेमात गौतमी लावणीसम्राज्ञीच्या भूमिकेत दिसतेय. स्त्री म्हणून अन्याय झालेली एक लावणीसम्राज्ञी म्हणून गौतमी दिसतेय.

काहीच दिवसांपूर्वी गौतमीने तिच्या सिनेमाबद्दल माहिती दिली होती. गौतमी म्हणाली... “माझा घुंगरु नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात माझी भूमिका काय असेल हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा." आता गौतमीचा हा नवीन सिनेमा कधी रिलीज येणार याची चाहते वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT