Gautami Patil Esakal
मनोरंजन

Gautami Patil: 'तर मी या क्षेत्रात आलीच नसती...'गौतमीने व्यक्त केली खंत...

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मिडियावर पाहिले तर हमखास त्यात गौतमी पाटीलच्या डान्सचा रिल तुम्ही पाहिलंच असणार.. सध्या तिच्या गाण्याची आणि डान्सची जोरदार चर्चा आहे. तिचा डान्स शो कुठेही असो त्यात काहीतरी राडा होणार हे मात्र नक्कीच... तिच्या डान्स शो असलेल्या ठिकाणी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी जमा होते. इतकच नाही तर जागा नसेल तर प्रेक्षक झाडावर किंवा इमारतीच्या भितींवर चढून तिचा डान्स शो पाहतात.

तिची लोकप्रियता एकीकडे आणि तिच्या गाण्याला विरोध करणारे दुसरीकडे. अशा परिस्थीतीत तिच्या डान्स शोवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी होत आहे. त्यावर गौतमीनं स्पष्टीकरण देत मी काहीही चुकीचं करत नसल्याचं म्हणतं माझ्या शोवर बंदी आणू नका अशी विंनतीही केली. त्यामूळं काही लोकांना तिच्या बद्दल सहानभूती आहे तर काहींना तिचा राग. यासर्व प्रकरणावर ती मनसोक्त बोलली.

Also Read - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

साम टीव्हीने 'सबसे कातील... गौतमी पाटील' ची घेतलेली मुलाखत घेतली आणि तिच्याकडूनचं यासर्व प्रश्नाची उत्तर दिली. यावेळी जेव्हा तिला या क्षेत्रात कशी आली आणि इथे आल्यावर तिला काय वाटतं तिने संघर्ष केला कसा केला अशा अनेक प्रश्नाची उत्तरं तिने दिली.

गौतमी म्हणाली की लहानपणापासून तिच्या आयूष्यात संघर्ष होता.वडिलाचीं साथ नसल्यामूळं मला आज हे सगळं करावं लागलं. बाकी काही नाही आज वडिलं व्यवस्थीत असते तर आज तिच्यावर ही वेळ आली नसती. मी या क्षेत्रात आलीचं नसती. हे सर्व चित्र वेगळं असतं..आमची परीस्थीती बिघडली आणि मी या क्षेत्रात आली.

गौतमीने याआधीही तिच्या परिस्थीती बद्दल सांगितले आहे. गौतमीने आठवीला असताना वडिलांना पहिल्यांदा पाहिले होते. पुण्यात स्थिरावल्यानंतर वडिलांना परत घरी आणण्याचा प्रयत्नही तिने केला होता. त्याना दारुचे व्यसन होते. ते तिच्या आईला मारहाण करायचे यामूळे त्यांनी वडिलांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आईचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली. तेव्हा ती या क्षेत्रात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT