Gautami Patil Interview esakal
मनोरंजन

Gautami Patil Interview : 'लोकांना कसं सांगू जशी गाणी वाजणार तशी मी नाचणार'! गौतमीची अनकट् मुलाखत वाचा

वादांच्या घेऱ्यात तरीही तोऱ्यात अशा भूमिकेत असणाऱ्या गौतमीची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Gautami Patil : वादांच्या घेऱ्यात तरीही तोऱ्यात अशा भूमिकेत असणाऱ्या गौतमीची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. तिची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेयर होण्याचा अवकाश काही वेळातच नेटकऱ्यांच्या वेगानं प्रतिक्रिया येऊ लागतात. आता एका मुलाखतीतून तिनं सविस्तपणे अनेक गोष्टींवर बिनधास्तपणे आपलं म्हणणं वाटलं आहे.(Gautami Patil Interview)

साम टीव्हीनं सबसे कातील गौतमी पाटीलची घेतलेली मुलाखत आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे. त्यामध्ये गौतमीनं आपल्यावर जे आरोप होतात, आपल्याविषयी ज्या प्रतिक्रिया दिल्या जातात, त्यासगळ्यावर दिलखुलासपणे उत्तर दिली आहे. गौतमी म्हणते, सगळ्याच लोकांना खुश करणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं हे काही सोपं नाही.

Also Read - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

आपली भूमिका मांडताना गौतमी म्हणते.... कार्यक्रमाला लोकं जास्त आल्यास अडथळा येतो. लोकं म्हणतात तुम्हाला भीती वाटते का, तर त्यांना मला सांगायचे आहे की, मला कशाची भीती वाटत नाही. मी जर चुकले असते तर विचार केला असता. पण चुकत नाही तर कशाला थांबू.

गौतमीनं आपल्या डान्सची सुरुवात कशी झाली यावर तिनं सांगितलं की, मी डान्स क्लासला होते. मग माझे अनेकांशी संपर्क तयार होत गेले. घरी परिस्थिती वाईट होती. आईचा अपघात झाला होता. अशातच मला लवकर काम करावे लागले. मला लहानपणापासून डान्सची आवड होती. ऑर्केस्ट्रामध्ये काम करेल असे वाटले नव्हते. पण परिस्थितीनं मला काही निर्णय घ्यावे लागले.

यावेळी लावणीवरूनही गौतमीनं तिचं परखड मत मांडलं आहे. मला काही लावणी करायची नव्हती. मला त्याचे फारसे ज्ञान नाही. लावणीचा माझा पहिला संबंध दहीहंडीमध्ये आला होता. मी पहिल्यापासून वेस्टर्न करत होते. आता लोकांना कसं सांगू जशी गाणी वाजणार तशी मी नाचणार.

गौतमीचा डान्स अश्लील आहे का यावर गौतमी म्हणते, मला लोकांना सांगायचे आहे की, अजुनही अश्लीलपणा सुरु आहे असे वाटत असल्यास त्यांनी माझ्या कार्यक्रमाला यावे त्यांनी पहावे. मी कुठे चुकते आहे ते लोकांनी सांगावे. आपण खरचं चुकलो आहोत मी माफी मागितली आहे.

मला भीती वाटत नाही. लोकं माझ्या बाजूनं आहे. लावणी मी काही शिकलेली नाही. माझं नवीन गाणं येत आहे ते लोकांनी पाहावे. मी जेवढं करु शकते तेवढं मी करते आहे. तुम्ही पाहा ती लावणी पाहा. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम हे गाणं व्हायरल झाले आहे. मी पहिल्यांदाच छान होते. आता जरा टेन्शन येते आहे. मला आनंद आहे की, आज मला अख्ख्या महाराष्ट्रानं सपोर्ट केला आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते.

मुलाखतीच्या शेवटी गौतमी म्हणते, पब्लिकमुळे मी लावणी करते आहे... लोकांनी ट्रोल केल्यामुळे मी लावणी करायला घेतली आहे. त्याची प्रॅक्टिस करते आहे. माझी लावणी सगळ्यांनी पहा. पण वेस्टर्न सोडणार नाही. प्रॉपर लावणी असं नाही. अश्लील काही करणार नाही. माझ्याकडून काही चूक होणार नाही. सगळे मी छान करेल. माझ्यावर विश्वास ठेवा....या शब्दांत त्यांनी चाहत्यांना आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT