Gautami Patil New Song  esakal
मनोरंजन

Gautami Patil New Song : 'मी करते तुम्हाला मुजरा!' गौतमीचा कडक अंदाज

सध्याच्या घडीला तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी मराठी सेलिब्रेटीमध्ये गौतमीचे नाव घ्यावे लागेल.

सकाळ डिजिटल टीम

Gautami Patil new marathi song video viral : मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अनोख्या अंदाजानं चाहत्यांना वेडं करण्यात गौतमीचं नाव सगळ्यात पुढे आहे. सध्याच्या घडीला तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी मराठी सेलिब्रेटीमध्ये गौतमीचे नाव घ्यावे लागेल. काही दिवसांपासून गौतमी ही वादाच्या भोवऱ्यातही सापडली होती. मात्र सबसे कातील गौतमी पाटील हा अंदाज तिनं पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.

गौतमीनं काही दिवसांपूर्वी तिचं नवं गाणं येणार असं एका पोस्टमधून सांगितलं होतं. आता ते गाणं व्हायरल झालं असून त्याला नेहमीप्रमाणे चाहत्यांचा आणि नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यावेळी गौतमीवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. गौतमीचा अंदाज वेगळा, तिचा डान्स निराळा गौतमीचं कौतूक करावं तेवढं कमी अशा प्रतिक्रिया तिला आता नेटकऱ्यांकडून मिळताना दिसत आहे.

Also Read - प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

सोशल मीडियावर गौतमीच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ आणि नेटकऱ्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. आता महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया सेलिब्रेटी म्हणून गौतमी आघाडीवर आहे. ज्या गावात गौतमीचा कार्यक्रम असेल तिथे आता पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याची वेळ येते असे दिसून आले आहे.

काही गावांमधील नागरिकांनी तर तिचा कार्यक्रम गावात नकोच अशीही भूमिका घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यात झालेल्या गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी गोंधळ घातला होता.

आता गौतमीच्या मी तुम्हाला करते मुजरा या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. त्यावर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव झाला आहे. काहींनी तर आगामी काळात गौतमी चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले आहे. तर बाकीच्या नेटकऱ्यांनी गौतमीला आपल्या शहरात, गावात जाहीर कार्यक्रमांचे निमंत्रणही दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT