Gautami Patil shared feelings about her first movie ghungroo sakal
मनोरंजन

Gautami Patil: कलाकारांनाही प्रेम होतं.. गौतमी पाटील 'तो' व्हिडिओ भलताच चर्चेत..

आपल्या लावणीमुळे चर्चेत असलेली गौतमीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

नीलेश अडसूळ

Gautami Patil: गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव तिच्या नृत्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. ग्रामीण भागात तर गौतमी पाटील हे नाव काढल्या शिवाय लोकांचे कार्यक्रम होत नाहीत. एकेकाळी टीकेची शिकार झालेल्या गौतमीच्या डान्सशो साठी सध्या वेटिंग आहे.

आज असे चित्र असले तरी मध्यंतरी गौतमी नृत्य करताना अश्लील हावभाव करते म्हणून तिच्यावर टिका करण्यात आली होती. राज्यभरात बरीच आंदोलनं झाली. त्यानंतर गौतमीने माफी मागत भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केलं होतं.

आता तीच गौतमी लवकरच चित्रपटातही झळकणार आहे. याच निमित्ताने माध्यमांशी बोलताना गौतमीने मनातल्या बऱ्याच गोष्टी बोलून दाखवल्या.

गौतमी 'घुंगरू' या मराठी सिनेमातून लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'घुंगरू' या नावातच चित्रपटाचा आशय आपल्या लक्षात येतो. लावणीवर आधारित या चित्रपट गौतमी प्रमुख भूमिकेत आहे. डान्सबरोबरच अभिनय करावा अशी गौतमीची खूप इच्छा होती, जी या निमित्ताने पूर्ण होणार आहे.

नुकतीच गौतमी माध्यमांसमोर आली. यावेळी तिला तिच्या 'घुंगरू' सिनेमाविषयी पत्रकारांनी विचारले. त्यावेळी कोणताही आडपडदा ठेवता गौतमी अगदी खुलेपणाणे बोलली.

यावेळी गौतमी म्हणाली, ''सिनेमा येतोय याबद्दल मला खूप छान वाटतंय.  सिनेमा आणि अभिनय याच्याशी माझा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता. पण सिनेमातील सगळ्या कलाकारांनी खूप सांभाळून घेतलं. अभिनय कसा करायचा हे शिकवलं. आता मी कसं काम केलं आहे हे तुम्ही सिनेमा रिलीज झाल्यानंतर पाहालच. माझ्या सहकलाकारांनी मला खूप समजून घेतलं.''

चित्रपटाच्या कथानका विषयी गौतमी म्हणाली, ''चित्रपटातही मी एक डान्सर आहे. कलाकारांवर हा सिनेमा आधारीत आहे. मी भूमिकेविषयी जास्त काही सांगणार नाही.  पण एका वयानंतर कलाकाराच्या आयुष्याचं होतं.. त्यालाही प्रेम होतं.. त्यालाही लग्न करावंसं वाटतं.. .पण त्यांचं पुढे काय होतं, कलाकार कसं आयुष्य जगतात यावर आधारित हा सिनेमा आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT