Deepika Padukone,Siddhant Chaturvedi Google
मनोरंजन

'गहराइयां सिनेमा तुम्हाला पाहता येणार नाही जर...' सविस्तर वाचा

सिनेमा ११ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

प्रणाली मोरे

दीपिका पदुकोण(Deepika Padukone),अनन्या पांडे(Ananya Pande),सिद्धांत चतुर्वेदीआणि धैर्य करवा यांच्या 'गहराइयां' या सिनेमाचा ट्रेलर जेव्हापासून रीलीज झाला आहे तेव्हापासून सिनेमातील किसिंग सीन आणि इंटिमेट सीनचीच चर्चा होत आहे. ट्रेलर पाहताच कळाले होते की या सिनेमाला १८ वर्षाखालील मुलांना पाहण्याची परवानगी नक्कीच मिळणार नाही. आता इतके बोल्ड सीन असल्यावर हे होणारंच होतं. या सिनेमाला 'A' सर्टिफिकेट मिळालं आहे. त्यामुळे आता ही गोष्ट कन्फर्म झाली आहे. आणि त्यामुळेच सिनेमातला एकही सीन कट न करता 'गहराइयां' त्याच्यातील संपू्र्ण इंटिमेट सीन,बोल्ड सीन सह प्रदर्शित केला जाणार आहे. दिग्दर्शक शकुन बत्राच्या या सिनेमात नात्यांमधील गुंतागुंतीवर भाष्य करण्यात आलं आहे. ११ फेब्रुवारीला हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

या सिनेमात इंटिमेट सीन शूट करण्यासाठी इंटिमसी डायरेक्टरचं सहाय्य घेतलं गेलं होतं. बॉलीवूडसाठी इंटिमसी डायरेक्टर ही कॉन्सेप्ट तशी नवीन आहे. सिनेमात इतरही चांगल्या गोष्टी आहेत पण त्या सोडून केवळ सिनेमातील इंटिमेट सीनवर जास्त चर्चा होत आहे. या सिनेमासाठी कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे पण त्याची कुठे चर्चाच होत नाही असं सांगत सिनेमाचा दिग्दर्शक शकुन बत्रानं नाराजगी व्यक्त केली आहे. दीपिका पदुकोणने मात्र सिनेमाच्या टीमचं आपल्या मुलाखतीत भरभरुन कौतूक केलं आहे. ती म्हणाली,''जेव्हा तुम्ही एखाद्या टीमसोबत काम करता तेव्हा तुम्हा सर्वांची विचार करण्याची पद्धत एकसमान असेल,प्रत्येकजण जर हजरजबाबी असेल,तुमच्यातला उत्साह दांडगा असेल तर त्या सिनेमातनं ते दिसतं. तुम्हाला जे म्हणायचं आहे ते अधिक प्रभावशालीरित्या व्यक्त करता येतं. आणि 'गहराइयां' करताना हाच अनुभव मला आणि आमच्या टीममधील सर्वांना आला''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

SCROLL FOR NEXT