Genelia DSouza wishes Riteish Deshmukh on his birthday  
मनोरंजन

रितेशला चक्क ८ वेळा धरावे लागले बायकोचे पाय?

...म्हणून रितेशला जेनेलियाच्या पाया पडावं लागलं

शर्वरी जोशी

कलाविश्वातील 'लय भारी' जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि पत्नी जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh). २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीची सोशल मीडियावर कायचम चर्चा रंगत असते. रितेशसोबत लग्न केल्यानंतर जेनेलियाचा कलाविश्वातील वावर तसा कमी झाला. मात्र, तरीदेखील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती कायमच चाहत्यांच्या भेटीला येत असते. त्यातच या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून या जोडीतील प्रेम, आदर व आपुलकीदेखील कायमच चाहत्यांना पाहायला मिळते. "त्यामुळे हे दोघं कायमच चाहत्यांच्या चर्चेत असतात. सध्या अशीच एक चर्चा या दोघांविषयी रंगली आहे. रितेशने एक-दोन नव्हे तर चक्क ८ वेळा जेनेलियाचे पाय धरले होते. हा मजेशीर किस्सा जेनेलियाने स्वत: शेअर केला आहे. (genelia-deshmukh-reveals-riteish-deshmukh-touched-her-feet-8-times-at-their-wedding-ssj93)

सध्या सोशल मीडियावर जेनेलिया-रितेशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेनेलियाने त्यांच्या लग्नातील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. यात रितेशला चक्क ८ वेळा जेनेलियाच्या पाया पडावं लागलं होतं.

अलिकडेच रितेश-जेनेलियाने 'सुपर डांसर 4' (Super Dancer 4) या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये एका डान्स परफॉर्मन्स दरम्यान जेनेलियाने तिच्या लग्नातील काही आठवणींना उजाळा दिला. त्यातच रितेशने तिचे पाय धरल्याचंही तिने सांगितलं.

"हा डान्स परफॉर्मन्स पाहून मला माझ्या लग्नाचे दिवस आठवले. आताच्या काळात आपण सगळेच लग्नातील फंक्शन्स नव्या अंदाजात सेलिब्रेट करत असतो. मात्र, मला पारंपरिक पद्धतीने केलेलं लग्नच जास्त आवडतं. आणि, माझं लग्नसुद्धा अशाच पारंपरिक पद्धतीने झालं याचा मला फार आनंद आहे. आमच्या लग्नातील प्रत्येक सोहळा फार सुंदररित्या झाला होतो. खासकरुन माझी पाठवणी. लग्नानंतर मी पाठवणीच्या वेळी मी खूप रडले होते आणि त्यावेळी चक्क रितेशने माझे पायसुद्धा धरले होते. रितेश ८ वेळा माझ्या पाया पडला होता. हो. ८ वेळा", असं जेनेलिया म्हणाली.

जेनेलियाचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर रितेशनेदेखील मजेशीर अंदाजात हा प्रसंग सांगितला. "लग्नानंतर मला नेमकं काय करायचंय हे कदाचित भटजींच्यादेखील लक्षात आलं असेल. त्यामुळे लग्नापूर्वीच त्यांनी माझ्याकडून सराव करुन घेतला होता."

दरम्यान, रितेश-जेनेलियाचा हा मजेदार किस्सा ऐकून सेटवर असलेल्या साऱ्यांनाच हसू अनावर झालं. मात्र, या दोघांनीही त्यांचा हा खास क्षण शेअर करुन पुन्हा एकदा त्यांच्यातील प्रेमाची झलक दाखवून दिली. तसंच अनेक ठिकाणी लग्नात पतीने पत्नीला नमस्कार करायची प्रथा असल्याचं सांगण्यात येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: ऋतुराज गायकवाड कर्णधार, पृथ्वी शॉही महाराष्ट्र संघात; पहिल्याच सामन्यात शुभमन-अभिषेकच्या संघाला भिडणार

Crime: धक्कादायक! अनेक तरुणींसोबत तब्बल लग्नाची रात्र ५५ वेळा साजरी; वधूसोबत नको ते कृत्य, एका वराची हादरवणारी कथा

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?

Latest Marathi News Live Update: भारतीय अन्न महामंडळाची पहिली मालवाहू धान्य रेल्वे आज काश्मीरमध्ये पोहोचली

Ahilyanagar Crime: 'जामखेड गोळीबारातील तीन आरोपी जेरबंद'; गावठी पिस्तूल व काडतुसे हस्तगत

SCROLL FOR NEXT