Trial Period Song Dhappa esakal
मनोरंजन

Trial Period Song Dhappa : कुणाला धप्पा द्यायचा म्हणतेय? जेनेलियाचं कौतूक करावं तेवढं थोडचं!

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांच्या कौतूकाचा विषय ठरलेल्या जेनेलियानं देखील वेबविश्वात पाऊल ठेवले आहे.

युगंधर ताजणे

Trial Period Song Dhappa : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांच्या कौतूकाचा विषय ठरलेल्या जेनेलियानं देखील वेबविश्वात पाऊल ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी जेनेलिया आणि रितेशचा वेड नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. जेनेलिया आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूडमधील विविध कलाकार हे ओटीटी स्पेसमुळे चर्चेत आले आहे. त्यांच्या वाट्याला मोठे चित्रपट आल्याचे दिसते. आदित्य रॉय कपूरनं रुझान ओटीटी स्पेसमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरची फर्जी नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. आता रितेशची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुजा - देशमुख चर्चेत आली आहे. त्याला कारणही खास आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

जेनेलिया आणि रितेश हे सातत्यानं सोशल मीडियावर दिसणारे सेलिब्रेटी आहेत. कोरोनाच्या काळात तर त्यांनी इंस्टावरील रिल्सच्या मदतीनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्या एका एका रिल्सला लाखोंचा प्रतिसाद मिळाला होता. ते रिल्स सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यासगळ्यात आता जेनेलियाच्या व्हायरल झालेल्या नव्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

जेनेलिया ही येत्या काळात ट्रायल पिरियड या सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर दिसणार आहे. त्याचा टीझर आणि ट्रेलर व्हायरल झाला होता. आता त्याचे पहिले गाणेही व्हायरल झाले आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

आज हे गाणे व्हायरल झाले असून अनेकांनी जेनेलियाचं कौतूक केलं आहे. ती क्लिप शेयर करताना तिनं केलं आहे की, फादर ऑन ट्रायल पिरियड. काही तासांपूर्वी व्हायर झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT