Genelia DSouza  
मनोरंजन

'निर्लज्ज आंटी' म्हणणाऱ्या ट्रोलरला जिनिलियाचं सडेतोड उत्तर, पहा व्हिडीओ

रितेश, प्रिती झिंटा आणि जिनिलियाच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्याने केली होती कमेंट

स्वाती वेमूल

अभिनेता, निर्माता अरबाज खानने Arbaaz Khan 'पिंच' हा नवीन चॅट शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या शोमध्ये तो बॉलिवूडमधल्या नामांकित सेलिब्रिटींना पाहुणे म्हणून बोलावतो आणि त्यांना ट्रोलिंग कल्चरबाबत विविध प्रश्न विचारतो. या शोचा दहावा एपिसोड नुकताच पार पडला असून यामध्ये रितेश देशमुख Riteish Deshmukh आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसूझा Genelia D'Souza यांनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रितेश, जिनिलिया आणि प्रिती झिंटा यांचा एका पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. रितेश प्रितीशी बोलत असताना बाजूला उभ्या असलेल्या या व्हिडीओमधील जिनिलियाची प्रतिक्रिया पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या होत्या. काहींनी जिनिलियावर अर्वाच्च भाषेत टिप्पणीसुद्धा केली होती. हे कमेंट्स दाखवत अरबाजने त्याच्या शोमध्ये जिनिलियाला तिची प्रतिक्रिया विचारली.

'निर्लज्ज, असभ्य आंटी नेहमीच ओव्हरअॅक्टिंग करत असते. लग्न झालं असताना, दोन मुलांची आई असताना तुझ्या वयाला आणि चेहऱ्याला अशा पद्धतीचे हावभाव चांगले दिसत नाहीत. तुझी ओव्हरअॅक्टिंग पाहून मुलांनासुद्धा लाज वाटेल', अशा पद्धतीची नेटकऱ्याची कमेंट होती. ही कमेंट वाचून जिनिलियाला धक्काच बसला. ती म्हणाली, "मला नाही वाटत, की त्या व्यक्तीचा तो दिवस चांगला गेला असेल. भाईसाहब, तुम्ही ठीक असाल अशी मी आशा करते. तुम्ही तुमच्या घरी ठीक राहा."

ट्रोलिंगबद्दल रितेशनेही यावेळी त्याचं मत मांडलं. "जर तुम्ही सेलिब्रिटी व्हायचा निर्णय घेत असाल, तर लोकांच्या रोषालाही सामोरं जावं लागेल. त्याबद्दल कोणीही वाईट वाटून घेऊ नये. मी नेहमीच अशा ट्रोलर्ससाठी लिहितो की, मित्रा.. माझं तुझ्यावर प्रेम आहे."

रितेश-जिनिलियाचा जुना व्हिडीओ-

पुरस्कार सोहळ्यातील या व्हिडिओमध्ये रितेश आणि प्रिती झिंटा एकमेकांसोबत गप्पा मारत असतात. या गप्पा जिनिलिया ऐकत असते आणि रितेशकडे रागाने पाहत असते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. त्यामधील जिनिलियाच्या हावभावांवरून अनेक मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते. प्रितीनेही या व्हिडीओवर कमेंट केली होती.

अरबाज खानच्या 'पिंच' या शोमध्ये याआधी सलमान खान, अनन्या पांडे, आयुषमान खुराना, फराह खान, फरहान अख्तर, टायगर श्रॉफ, कियारा अडवाणी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daily Horoscope : राशिभविष्य - शनिवारी ७ नोव्हेंबर २०२६

Mohammed Shami retirement from Tests: "आज, जड अंतःकरणाने..."; मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; म्हणाला, चांगल्या-वाईट काळात माझ्यावर...

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT