neel madhav 
मनोरंजन

‘यु गॉट मॅजिक विथ नील माधव’चा आगामी सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- प्रवास, नवनीन ठिकाणं शोधून त्याच्या आनंद घेणं कोणाला नाही आवडत? देशभरात कुठे कोणतं ठिकाण कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. असाच एक शो आता तुमच्या भेटीला येणारआहे. भारताचा प्रसिद्ध इल्‍युशनिस्‍ट नील माधव सोनी बीबीसी अर्थवरील ‘यू गॉट मॅजिक विथ नील माधव’च्‍या नवीन सीझनमध्ये त्‍याच्‍या हजारो नवीन कल्पना घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. 

एक व्यक्ती, सात शहरे आणि भारतभरातील जादुई घटक शोधण्‍याचा हा रोमहर्षक प्रवास लवकरच सुरु होईल. यावेळच्या सिझनमध्ये नील देहरादून, केरळ, उत्तराखंड, अहमदाबाद, आग्रा, देवगड आणि चंदिगड अशा ठिकाणची संस्कृती दाखवण्यसोबत काही हटके आणि सिक्रेट गोष्टींचा उलगडा करताना पाहायला मिळणार आहे. ‘यू गॉट मॅजिक विथ नील माधव’ हा शो १९ नोव्‍हेंबरपासून रात्री १० वाजता सोनी बीबीसी अर्थवर प्रसारित होणार आहे.

भारताच्‍या कानाकोप-यात प्रवास करत नील भारताच्‍या संपन्‍न संस्कृतीला दाखवतो आणि समोर येणा-या प्रत्‍येक घटकामधील जादुई बाबीचा शोध घेतो. या शोच्या अनुभवाबाबत नीलने सांगितलं, “उत्तराखंडमधील नयनरम्‍य टेकड्या, केरळमधील सर्वात प्रसिद्ध कवनाट्टिंकारा बोट रेस, अहमदाबादमधील पतंगोत्सव आणि राजस्थानातील अत्‍यंत सुंदर वास्तुकला, वाडे पाहायला मिळाले. विविध ठिकाणी प्रवास करत माहितीपूर्ण अनुभव घेण्‍याचा, सर्व पार्श्‍वभूमींमधील लोकांना भेटण्‍याचा आणि त्‍यांच्‍याप्रमाणेच माझी कला त्‍यांच्‍यासोबत शेअर करण्‍याचा आनंद अभूतपूर्व राहिला आहे.”

get ready for a magical travelogue with the premiere of you got magic with neel madhav  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT