kranti redkar facebook
मनोरंजन

"ट्विटरवर खेळ खेळण्यापेक्षा कोर्टात पुरावे सादर करा"; क्रांतीने मलिकांना सुनावलं

"त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अशा प्रकारचे आरोप झाले आहेत."

स्वाती वेमूल

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे बॉलिवूडला टार्गेट करत नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांची पत्नी व मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने दिली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत क्रांतीने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांवरही उत्तर दिलं आहे.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत क्रांती म्हणाली, "समीर नक्कीच बॉलिवूडला टार्गेट करत नाही. दर महिन्याला तो गोव्यात ड्रग्ज प्रकरणी कारवाया करण्यासाठी जातो. गोव्यात कोणतेही सेलिब्रिटी नाहीत. या प्रकरणात एका विशिष्ट व्यक्तीचा स्वारस्य असतानाच हे सर्व का घडत आहे? त्याच्यावर (समीर वानखेडे) इतर कोणत्याही प्रकरणात खंडणीचे आरोप का लावले गेले नाहीत? त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत अशा प्रकारचे आरोप पहिल्यांदाच झाले आहेत."

पतीवर लावण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांना उत्तर देताना क्रांती पुढे म्हणाली, "समीरने कधीही त्याच्याविरुद्ध कोणतीही चौकशी नाकारली नाही. तो नेहमीच त्यासाठी तयार असतो. जर तुम्हाला तो (समीर) चुकीचा वाटत असेल, तर चौकशी करा आणि पुरावे सादर करा. त्याने कधी, कुठे पैसे घेतले ते दाखवा. तुमच्याकडे फोन चॅट, स्टिंग ऑपरेशन किंवा इतर कुठलेही पुरावे आहेत का? ८ कोटी, १८ कोटी, २५ कोटी, तुमच्या मनात जो आकडा येतोय त्यावरून तुम्ही काहीही बडबड करत आहात. देशसेवा करणाऱ्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा हा अपमान आहे."

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनुसार समीर वानखेडे हे कधीच दुबईला गेले नव्हते, असंही क्रांतीने स्पष्ट केलं. मालदीव ट्रिपबद्दल क्रांतीने सांगितलं, "आमच्या मुलांसह मी आणि समीर मालदीवला गेलो होतो. आम्ही ज्याठिकाणी राहत होतो, तिथे कोणतेच सेलिब्रिटी नव्हते. जर कोणाला उत्तरं हवी असतील तर त्यांनी थेट कोर्टात जावं आणि तिथे मागणी करावी. ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा खेळ खेळत बसू नका. एका छोट्याशा गावातून मुंबईला येऊन अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर स्वत:चं अस्तित्व निर्माण करणाऱ्यावर (समीर वानखेडे) मला खूप अभिमान आहे. त्याला त्याच्या कामासाठी दोन-तीन वेळा मेडल्स देऊन गौरविण्यात आलं आहे. अशा अधिकाऱ्यावर तुम्हाला अभिमान असायला हवा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT