sonu sood governor koshyari 
मनोरंजन

राज्यपाल कोश्यारींनी केलं सोनू सूदच्या कामाचं फोन करुन कौतुक, भेटण्याचीही व्यक्त केली इच्छा

सकाळवृत्तसेवा

मुंबई- अभिनेता सोनू सूद दिवसरात्र स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत करतोय. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी सोनूने स्वतः रस्त्यावर उतरुन त्यांच्यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे. सोनूची ही अथक मेहनत पाहून त्याच्या कामाचं चांगलंच कौतुक होतंय. सिनेइंडस्ट्रीपासून ते राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत सोनूच्या कामाची दखल घेतली जातेय. आता तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोनू सूदला फोन करुन त्याच्या कामाची पावती दिली आहे. 

अभिनेता सोनूला संपूर्ण देशभरातून दर दिवशी साधारण ५६ हजार मेसेज आणि फोन येत असतात. काही दिवसांपूर्वीच सोनूने लोकांना जे गावी जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना मदत हवी असल्यास त्याने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार त्याला दिवसभरात हजारो लोकांशी संपर्क साधावा लागतो. आत्तापर्यंत सोनूने १२ हजार मजुरांना त्यांच्या गावी सुखरुप पोहचवण्याचं काम केलं आहे. इतरही अनेकांची मदत करण्याची त्याची तयारी सुरु आहे. 

मात्र या सगळ्यात सोनूसाठी बुधवारचा दिवस हा खास होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोनूला खास फोन करुन त्याच्या कामाचं कौतुक केलं आहे. सोनूने यासाठी त्यांचे आभार मानले आहेत. याविषयी एका मुलाखतीत सांगतावा सोनू म्हणाला की, त्यांनी माझ्या कामाचं फोन करुन कौतुक केलं. इतकंच नाही तर याविषयी अधिक सांगताना सोनू असंही म्हणाला की राज्यपाल यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त करत उद्या परवामध्ये कॉफीसाठी भेटू असंही म्हटलं.

लॉकडाऊनमध्ये अनेकांसाठी देवदूत बनलेल्या सोनूने त्याच्या सोशल साईटवरुन माफी देखील मागितली आहे. सोनू म्हणाला की, 'तुमचे मेसेज आमच्यापर्यंत वेगाने पोहोचत आहेत. तुमच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी  मी आणि माझी टीम प्रयत्नशील आहे.. मात्र यादरम्यान अनावधानाने माझ्याकडून काही मेसेज वाचायचे राहून गेले असल्यास मला माफ करा. ' 

governor bhagatsingh koshyari appreciates sonu sood work for migrants  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan : आज रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार; किती वाजता अन् कुठे Live पाहता येणार? जाणून घ्या...

शाळा-महाविद्यालयांना बॉम्बच्या धमक्या देणाऱ्या महिलेला गुजरातमधून अटक; प्रेम नाकारल्यामुळे घेतला सूड, मोदी स्टेडियम उडवण्याचीही धमकी

Latest Marathi News Live Update : 'स्वाभिमानी'ने रोखली 'वारणा'ची ऊस वाहतूक; दोन दिवसांत दर न जाहीर केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Pune ATS : दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईत जुबेरकडून सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

विदर्भाच्‍या पोरी खेळातही भारी! क्रिकेटसाठी सोडले गाव अन् घर; पुसदच्या कस्तुरी जगतापचा संघर्ष

SCROLL FOR NEXT