govinda dance
govinda dance 
मनोरंजन

गोविंदाने बर्थ डे पार्टीमध्ये केला धमाकेदार डान्स, कपिल शर्मासोबत या सेलेब्सनी लावली हजेरी

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेता गोविंदाने २१ डिसेंबर रोजी त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी त्याने त्याच्या घरी एक धमाकेदार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीतील अनेक व्हिडिओ सध्या सोशल साईटवर धुमाकुळ घालत आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये गोविंदा त्याच्या पत्नीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसतोय. हा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  

गोविंदाने या खास दिवशी आयोजित केलेल्या बर्थ डे पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीत गोविंदा त्याच्याच 'हिरो नंबर १' आणि 'कुली नंबर १' या सिनेमातील गाण्यांवर डान्स करत होता. डान्स फ्लोरवर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा देखील त्याची साथ देत होती. गोविंदाच्या ज्या सिग्नेचर स्टेप्स आहेत त्या देखील तिने केल्या.

यादरम्यान कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि शक्ती कपूर देखील दिसून आले. गणेश आचार्य गोविंदाचटं हिट गाणं 'हुस्न है सुहाना' या गाण्यावर थिरकताना दिसले. थोड्या वेळात गोविंदाची देखील एंट्री होते आणि तो देखील यावर थिरकतो. गोविंदाच्या या पार्टीमध्ये कॉमेडियन कपिल शर्मा देखील पोहोचला. दोघांनी एकत्र कॅमेरासाठी पोज देखील दिली. 

गोविंदाचे वडिल अरुण कुमार आहूजा त्यांच्या काळातील सुप्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी ३० ते ४० सिनेमांमध्ये काम केलं होतं. तर गोविंदाची आई निर्मला देवी शास्त्रीय गायिका होत्या ज्या सिनेमांमध्ये गाणं गात होत्या. एका सिनेमाची निर्मिती करताना गोविंदाच्या वडिलांचं खूप मोठं नुकसान झालं आणि त्यांना त्यांचा बंगला सोडून मुंबईतील विरारमध्ये येऊन राहावं लागलं होतं. गोविंदाने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये आत्तापर्यंत जवळपास १६५ सिनेमांमध्ये काम केलं. १९८६मध्ये गोविंदाचा पहिला सिनेमा 'इल्जाम' रिलीज झाला आणि तो मोठ्या पडद्यावर लोकप्रिय झाला.    

govinda birthday bash dance with wife sunita also shakti kapoor joins him watch video  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT