Govinda Avatar Offer esakal
मनोरंजन

Govinda Avatar Offer: चक्क गोविंदा अवतारचा हिरो होणार होता, का नाकारली जेम्स कॅमेरूनची ऑफर ?

अवतारची ऑफर गोविंदानं का नाकारली? कारणं ऐकून तुम्ही म्हणाल गोविंदानं हे काय केलं....

सकाळ डिजिटल टीम

Govinda bollywood actor happy birthday refuses Avatar James Cameron : जगप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरुनच्या अवतार या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटानं भारतातून दीडशे कोटींची कमाई केली होती. तर जगभरातील हा आकडा तीन हजाराच्यावर आहे. तब्बल तेरा वर्षांनी अवतारचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.

आज बॉलीवूडमधील सर्वांचा लाडका चिक्की अर्थात गोविंदाचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. सध्या गोविंदा एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्यानं आपल्या एका मुलाखतीमधून अवतार चित्रपटासंबंधी धक्कादायक खुलासा केला आहे. बऱ्याच जणांना ती गोष्ट माहिती नसेल की, गोविंदाला अवतार चित्रपटाची ऑफर आली होती. त्यावेळी त्यानं तो चित्रपट चक्क नाकारला होता. त्याची कारणं ऐकून तुम्ही म्हणाल त्यानं सोन्यासारखी संधी गमावली होती.

Also Read- असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

अवतार द वे ऑफ वॉटर नावाचा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. हजारो कोटींचा खर्च करुन तयार केलेल्या या चित्रपटाची भव्यता, त्याची निर्मिती प्रेक्षकांना भावली आहे. अवतारच्या पहिल्या भागासाठी जेव्हा गोविंदाला विचारणा करण्यात आली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला होता. पहिल्यांदा त्याला विश्वासच बसला नाही तो म्हणजे आपल्याला अवतारची ऑफर आली म्हणून. मात्र गोविंदानं अवतारची पूर्ण स्क्रिप्ट आणि त्याच्या प्रॉडक्शनविषयी माहिती घेतल्यानंतर त्यानं चक्क त्या चित्रपटाला नकार दिला होता.

गोविंदानं एका मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला होता. त्यात तो म्हणतो, मला काही गोष्टी खटकल्या होत्या. त्यातील एक म्हणजे अंगाला निळा रंग लावायचा. मला ते पटले नाही. मी त्याला नकार दिला. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोविंदानं वेगवेगळे खुलासे केले आहेत. अंगाला काहीही झालं तरी निळा रंग लावणार नाही यावर ठाम होतो. म्हणून तो चित्रपट माझ्या हातून गेला. जेव्हा अवतार प्रदर्शित झाला होता. तो पाहिल्यावर मी कॅमेरुन यांना फोन करुन कळवलंही होतं की , तुमचा चित्रपट छान झाला आहे. मात्र सोशल मीडियावर गोविंदानं जेव्हा अशा गोष्टीसाठी चित्रपट नाकारला तेव्हा चाहत्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT