Govinda on allegations of unprofessionalism, ‘People want to pull you down’  Google
मनोरंजन

'Unprofessional Govinda'; बॉलीवूडच्या आरोपांना वैतागलाय अभिनेता, म्हणाला...

मनिष पॉल सोबतच्या पॉडकास्ट मुलाखतील गोविंदानं पहिल्यांदा बॉलीवूडमधल्या कठीण काळावर भाष्य केलं आहे.

प्रणाली मोरे

८०-९० च्या दशकात गोविंदा (Govinada) हे बॉलीवूडमधलं(Bollywood) मोठं प्रस्थ होतं. त्याचाच सगळीकडे बोलबाला होता. गोविंदाने बॉलीवूडमध्ये १४-१५ वर्ष स्टारडम अनुभवलं. एक अशी वेळ होती जेव्हा तो एका वर्षात १० ते १४ सिनेमे करायचा. पण २००० सालाच्या सुरुवातीला अचानक गोविंदानं सिनेमातून ब्रेक घेतला अन् तो राजकारणात निघून गेला. त्यावेळच्या वृत्तांनुसार निर्माते-दिग्दर्शक यांनी गोंविदावर अनप्रोफेशनल असण्याचा आरोप केला होता. जवळ-जवळ संपू्र्ण फिल्मइंडस्ट्री गोविंदाच्या विरोधात गेली होती. गोविंदानं आता अनेक वर्षांनी आपल्यावर लागलेल्या त्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

गोविंदा नुकताच मनीष पॉलच्या पॉडाकास्टमध्ये सामिल झाला होता. शो मध्ये त्यानं आपला भाचा कृष्णा अभिषेकसोबतचं भांडण आणि त्यानं मागितलेली माफी यावर देखील भाष्य केलं आहे. तसंच,त्याला 'अनप्रोफेशनल' म्हणत केलेल्या आरोपाचं खंडन करीत आपली बाजू मांडली आहे. मनिष पॉलने गोविंदाला विचारलं की दिग्दर्शक आणि निर्माता त्याच्यावर अनप्रोफेशनल आणि आळशी होण्याचा आरोप लावतात ते का आणि कसं,काय कारणं आहेत,किती तथ्य आहे यात?

याचं उत्तर देताना गोविंदा म्हणाला होता,''जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा खूप सारे लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा मी १४-१५ वर्ष माझ्या करिअरमध्ये यशस्वी होतो तेव्हा कोणीच असा मुद्दा उचलला नाही. ही फिल्मइंडस्ट्री आहे. इथे लोक वेळेनुसार,सोईनुसार आपला रंग दाखवतात,बदलतात. त्यात सर्व वेळेला आर्थिक फायदा पाहिला जातो''.

गोविंदा पुढे म्हणाला, ''परंतु जेव्हा मी पाहिलं की लोक माझ्या विरोधात जात होते तेव्हा मी काहीच करु शकलो नाही. जे लोक अॅस्ट्रॉलॉजी, न्युमरॉलॉजी आणि वास्तुशास्त्र सारख्या गोष्टींना फॉलो करतात,ते अशा लोकांकडे लक्ष देत नाहीत. यांच्यासारखी मोठी मोठी संकटं त्यांचं काही करू शकत नाही''.

गोविंदानं 1986 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानं 'तन बदन' या सिनेमात मुख्य हिरोचं काम केलं होतं. परंतु या सिनेमा आधी त्यानं 1985 मध्ये 'लव 86' सिनेमाचं शूटिंग सुरू केलं होतं. साल 1986 मध्ये गोविंदाचा पहिला सिनेमा इल्जाम प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी 'लव 86'. दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. सुपरहिट पदार्पणानंतर गोविंदा प्रत्येक निर्मात्या-दिग्दर्शकाच्या नजरेत आला. दिग्दर्शक डेव्हिड धवन सोबत गोविंदानं जवळ-जवळ17 सिनेमे केले आहेत. परंतु नंतर त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यानंतर पुन्हा कधीच गोविंदानं डेव्हिड धवन सोबत काम केलं नाही.

गोविंदा आता अभिनयानंतर गाण्यात करिअर करण्यात बिझी आहे. १९९८ मध्ये आपला पहिला म्युझिक अल्बम काढल्यानंतर गोविंदाने आता गेल्या काही दिवसांत आपली काही गाणी रिलीज करण्याचा सपाटा लावला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं आपला म्युझिक व्हिडीओ 'प्रेम करू छूं' रिलीज केला आहे. ज्याला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT