Sunita Ahuja Troll:
Sunita Ahuja Troll: Esakal
मनोरंजन

Sunita Ahuja Troll: गोविंदाची बायको मंदिरात गेली अन् वादात अडकली! केली मोठी चुक..

Vaishali Patil

बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदा प्रमाणेच त्याची पत्नी सुनीता आहुजा ही नेहमीच चर्चेत असते. सुनीता ही भलेही अभिनयापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते

मात्र गोविंदाची पत्नी पुन्हा एकदा वादात आली आहे. सुनीता आहुजाने नुकतेच महाकाल मंदिरात दर्शन घेतले होते. भगवान शिव यांच्या उज्जैनमधील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी ती पोहचली होती. मंदिरातील सुनीता आहुजाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

समोर आलेल्या फोटोंमध्ये सुनीतने गुलाबी रंगाची साडी घातली होती. तिने कपाळावर मोठी बिंदी आणि कुंकू लावला आहे. तिच्या गळ्यात पांढऱ्या रंगाची ओठणी दिसते, ज्यावर जय महाकाल लिहिलेले दिसते. त्याचवेळी तिच्या खांद्यावर हाताची पिशवी असल्याने गोंधळ उडाला.

Sunita Ahuja

यावेळी सुनीता आहुजा ही एकटी दिसली. सुनीता आहुजा यांच्यावर मंदिरात जाताना नियम मोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. ती महाकालेश्वराच्या गाभाऱ्यात पर्स घेऊन जाताना दिसली. मंदिर परिसराच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ती सोशल मीडियावरील यूजर्सच्या निशाण्यावर आली आणि तिला खुप ट्रोल करण्यात आले.

Sunita Ahuja

सुनीताला बॅग घेऊन आत कसे जाऊ दिले? आणि मंदिर समितीच्या कोणत्याही तिला अडवले का नाही. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सुनीता आहुजासोबत मंदिराचे पंडितही दिसत आहेत. असे अनेक प्रश्न नेटकरी विचारत आहे.

या घटनेनंतर मंदिराच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण कोणीही बॅगमध्ये काहीही घेऊन मंदिरात प्रवेश करू शकतो. हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचल्याने चांगलाच गदारोळ झाला आहे.

देवाच्या मंदिरातही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याने यूजर्सनी तिला खडसावले. सध्या हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई केली जाईल. कोणी चूक केली असेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल,असे मंदिराचे प्रशासक संदीप सोनी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT