Lata Mangeshkar was not mentioned in the Grammy's In Memoriam segment.(PTI) Google
मनोरंजन

Grammy 2022: पुरस्कार सोहळ्यात लता मंगेशकरांच्या बाबतीत घडली घोडचूक...

'The Grammy Awards 2022' सोहळा नुकताच पार पडला, मात्र भारतीय चाहत्यांनी सोहळ्याच्या विरोधात सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटवला आहे.

प्रणाली मोरे

संगीत क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ग्रामी पुरस्कार(Grammy Awards2022) सोहळ्याकडे पाहिलं जातं. या सोहळ्यात संगीतक्षेत्रातील अनेक दिग्ग्जांना संगीतातील त्यांच्या योगदानासाठी पुरस्कारानं गौरविलं जातं. संगीत क्षेत्रातील मान्यवर आवर्जुन या सोहळ्याला उपस्थिती दर्शवतात. पण यंदा एक मोठी घोडचूक या पुरस्कार सोहळ्यात घडली आहे. 'द ग्रामी अॅवॉर्ड्स 2022' मध्ये यंदा जगप्रसिद्ध गायिका स्वरसम्राज्ञाी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली वाहिली गेली नाही. खरंतर या सोहळ्यात गेल्या वर्षभरात संगीतक्षेत्रातील ज्या दिग्गजांचं निधन झालं त्यांच्या आठवणींचं स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. पण यंदा गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संगीतक्षेत्रातील योगदानाविषयी स्मरण करायला मात्र ग्रामी पुरस्कार सोहळ्याला विसर पडला आहे. ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली गेली नव्हती त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पहायला मिळाला. त्यांनतर लगेचच ग्रामी पुरस्कार सोहळ्यात तसाच प्रकार घडल्यांन आता याची जोरदार चर्चा रंगली आहे.

'द ग्रामी पुरस्कार' सोहळ्यात यंदा सिने-संगीत क्षेत्रातील निधन पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहिली गेली. पण यात चक्क जागतिक पातळीवर सर्वपरिचित असलेल्या आणि सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना मात्र वगळण्यात आलं. तर संगीतकार-गायक बप्पी लाहिरी यांचं देखील स्मरण करण्यात आलं नाही. ग्रामी पुरस्कार सोहळ्यात फक्त ब्रॉडवे संगीतकार स्टीफन सोंधेम,टेलर हॉकिन्स आणि टॉम पार्कर यांना श्रद्धांजली वाहिली गेली. लता मंगेशकर यांच्या चाहत्यांनी या घटनेनंतर सोशल मीडियावर नाराजगी व्यक्त केली आहे. चाहत्यांनी ग्रामी पुरस्कार सोहळ्याशी जोडलेल्या आयोजकांना थेट 'अज्ञानी' म्हणून संबोधलं आहे. चाहत्यांनी पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. ग्रामी पुरस्कार आयोजकांना लता मंगेशकर यांचा विसर पडावा हे त्यांचं अपयश आहे,असं देखील काही चाहत्यांनी म्हटलं आहे. तर काहींनी ग्रामीच्या सर्वसमावेशक आणि विविधता या एवढ्या वर्षांच्या परपंरेवरच बोट ठेवल आहे.

ट्वीटरवर तर थेट एका चाहत्यानं म्हटलं आहे,''ज्यांना सोहळ्यात श्रद्धांजली वाहिली गेली त्यांच्यापेक्षा लता मंगेशकर हे नाव नक्कीच मोठं होतं. किती हे अज्ञान. लताजी या सगळ्यात मोठ्या स्टार होत्या. तरीदेखील असं घडावं आयोजकांकडून''. अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. लता मंगेशकर यांचं निधन ६ फेब्रुवारी,२०२२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी झालं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर महिनाभर कोरानाशी झुंज देणाऱ्या लता मंगेशकर यांनी शेवटचा श्वास मुंबईतील रुग्णालयात घेतला. लता मंगेशकर यांनी जवळजवळ ३६ भाषांमध्ये गाणी गायली आहेत. लता दिदींनी वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी आपल्या संगीतक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. भारतातच नाही तर जगभरात त्यांच्या आवाजाचे चाहते होते. असं असताना ग्रामी पुरस्कार सोहळ्याला त्यांच्या नावाचा विसर पडावा यावर नाराजीसोबतच आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT