grand daughter of big b Amitabh bachchan navya naveli nanda reply to a social media user who asked her to get a job 
मनोरंजन

'पहिल्यांदा तू नोकरी तर कर मग बोल'; अमिताभची नात झाली ट्रोल 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदेली ही तिच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अजूनपर्यत तिला काही बॉलीवूडमध्ये इंट्री मिळालेली नाही. त्यासाठी प्रयत्नशील आहे. अमिताभ यांची नात अशी ओळख असलेल्या नव्या नंदेलीला सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्समही मोठा आहे. तिनं नुकतचं सोशल मीडियावर तिच्या एका 'प्रोजेक्ट नवेली' ची घोषणा केली आहे. त्याला चाहत्यांचा प्रतिसादही मिळत आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून ती महिला सक्षमीकरणावर भर देणार आहे. मात्र त्यामुळे तिला काही नेटक-यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. नव्यानं त्यांनाही आपल्या पध्दतीनं उत्तर दिलं आहे.

नव्यानं इंस्टावर एक पोस्ट केली आहे त्यात तिनं लिहिले आहे की, मी जो प्रोजक्ट करत आहे तो देशाच्या महिला संसाधन विकास मंडळाकडे गेला आहे. त्यांनीही त्याची दखल घेतली आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून मी महिला सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष भेदभाव या दोन गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. प्रोजेक्टमधून महिलांना आर्थिक सक्षमता आणि सामाजिक न्याय मिळेल अशी मला आशा आहे. नव्याच्या या पोस्टला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र काही जणांनी त्यावरुन तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरनं म्हटले की, खरं सांगतेस की काय, पहिल्यांदा महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यात तर तुझा प्रोजेक्ट यशस्वी होऊ दे मग पाहू. त्यानंतर तू भारताच्या गोष्टी कर.

नव्यानं त्या युझर्झला प्रत्युत्तर दिलं आहे. ती म्हणाली, अर्थातच, सकारात्मकतेसाठी मी प्रयत्नशील आहे. आपण जी प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद. त्यानंतर एकानं तिच्यावर टीका करताना म्हटलं की, तुला पहिल्यांदा एखादी नोकरी तर कर, तुला त्याची गरज आहे. त्यानंतर या गोष्टीकडे लक्ष दे. त्यालाही नव्यानं उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, माझ्याजवळ नोकरी आहे. त्यावर तिनं एक इमोजीही पोस्ट केला आहे. नव्या सध्या आरा हेल्थ फाऊंडेशनची संस्थापक सदस्य आहे. त्यात महिलांच्या प्रश्नांवर काम केले जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी नव्यानं पुरुषप्रधान समाजावर एक पोस्ट केली होती. जेव्हा तुम्ही कुठल्या नवीन व्यक्तींशी बोलता त्यावेळी ती बाब जास्त प्रकर्षानं जाणवू लागते. असे तिनं म्हटले होते. 

मला हे माहिती आहे की आता स्वतला सिध्द करावे लागेल. मी सध्या अशा वातावरणात आहे की जिथे पुरुषी संस्कृती आहे. नव्यानं इंग्लडमधील सेव्हन ऑक्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. तिनं न्यूयॉर्कमधील फोरडम मधील एका विद्यापीठातूनही उच्च शिक्षण घेतले आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT