aamir khan , pathaan SAKAL
मनोरंजन

Aamir Khan: वाढलेली दाढी, पिकलेले केस... आमिर खानचा असा अवतार बघून फॅन्स हैराण

आमिर खानला अशा अवतारात पाहणं सर्वांसाठी नवीन आहे.

Devendra Jadhav

Aamir Khan: एकीकडे वयाच्या ५७ व्या वर्षी शाहरुख खान पठाण च्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. शाहरुख सोबत सलमान खान सुद्धा फॉर्मात आहे. दोन्ही खान चर्चेत असताना आमिर खान मात्र गायब झालाय. नुकत्याच दिल्लीतील एका कार्यक्रमात आमिर खान पंजाबि गायक, अभिनेता जसबीर जस्सी सोबत दिसला. आमिर खानला अशा अवतारात पाहणं सर्वांसाठी नवीन आहे.

जसबीर जस्सीने आमिर सोबतचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. "मनाने श्रीमंत.. आमिर" अशा शब्दात जस्सीने आमिर खानचं कौतुक केलंय. या फोटोत आमिरची ढाढी आणि केस पिकले आहेत. आमिर बारीक दिसतोय. एकूणच आमिर खानचा असा वेगळाच लूक त्याच्या फॅन्सच्या पचनी पडत नाहीये. आमिर आणि जस्सी यांचा फोटो थोड्याच वेळात व्हायरल झालाय.

आमिर खानचा २०२२ ला रिलीज झालेला लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. पुढे काही महिन्यांनी आमिर खान सिनेमातून थोडा ब्रेक घेणार, अशी घोषणा झाली. लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यावर आमिरचं स्टारडम कमी झालंय का? अशा चर्चा सुरु झाल्यात. अशातच आमिरला अशा अवतारात पाहिल्यानंतर त्याचं वलय कमी झालंय, अशाही चर्चा सुरु झाल्यात.

लाल सिंग चड्ढा कडून आमिरला खूप अपेक्षा होती. आमिरचा हा सिनेमा सुपरहिट होईल अशाही शक्यता वर्तवण्यात आलेल्या. आमिर सुद्धा प्रचंड आशावादी होता. परंतु लाल सिंग चड्ढा दणक्यात आपटला आणि आमिरच्या सुपरहिट कारकिर्दीला थोडा ब्रेक लागला. लाल सिंग चड्ढा नंतर आमिरने कोणत्याही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. काहीच दिवसांपूर्वी आमिर काजोल सोबत 'सलाम वेंकी' सिनेमात दिसून आला.

आमिरचा नवीन सिनेमा कधी येणार याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. आमिरचे याआधीचे दोन्ही सिनेमे म्हणजेच लाल सिंग चड्ढा आणि ठग्झ ऑफ हिंदुस्तान फ्लॉप झाले. आता आमिरचा पुढचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होणार कि त्याच्या फ्लॉप सिनेमाची हॅट्ट्रिक होणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT