gufi pental passed away at the age of 78 who played role of shakuni mama in mahabharat serial SAKAL
मनोरंजन

Gufi Paintal Death: महाभारताले 'शकुनी मामा' काळाच्या पडद्याआड, अनेक दिवसांपासून होते रुग्णालयात

गुफी पेंटल यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

Devendra Jadhav

Gufi Pental Death News: प्रसिद्ध टीव्ही मालिका महाभारतात शकुनी मामाची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचं निधन झालंय.

गुफी पेंटल यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची प्रकृती सुधारत असल्याची बातमी आली. मात्र अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला.

(gufi pental passed away at the age of 78 who played role of shakuni mama in mahabharat serial)

गुफी पेंटल यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जातोय. महाभारत मालिकेमध्ये शकुनी मामाची भूमिका करणारे प्रसिद्ध कलाकार गुफी पेंटल यांना काहीच दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृती विषयीची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी गुफी यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु आता गुफी यांची प्राणज्योत मालवली

गुफी पेंटल बऱ्याच काळापासून वयोमानाशी संबंधित अनेक आजारांशी लढत होते. गुफी पेंटल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ३१ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अभिनेता असण्याव्यतिरिक्त, गुफीने काही टीव्ही शो आणि श्री चैतन्य महाप्रभू नावाचा चित्रपट देखील दिग्दर्शित केला.

त्यांनी बीआर फिल्म्ससोबत असोसिएट डायरेक्टर, कास्टिंग डायरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले आहे.

गुफी पेंटल हे प्रसिद्ध विनोदी कलाकार पेंटलचे भाऊ होते. पेंटल यांना आपण सत्ते पे सत्ता, रफू चक्कर, परिचय अशा चित्रपटांमध्ये काम केले होते.

गुफी पेंटल त्याच्या दमदार अभिनयासाठीही ओळखले जात होते. मात्र महाभारतातील शकुनीमामाची भूमिका साकारून त्यांना जी प्रसिद्धी मिळाली, ती इतर कोणत्याही पात्राला मिळाली नाही.

गुफी यांनी साकारलेली शकुनीमामाची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिलीय. गुफी आज काळाच्या पडद्याआड गेले असले तरीही त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT