Filmfare OTT Awards esakal news
मनोरंजन

Filmfare OTT Awards: 'गुल्लक' वर कौतूकाचा वर्षाव, 5 पुरस्कारांवर मोहोर!

टीव्हीएफच्या दर्जेदार आशयांनी परिपुर्ण असलेल्या काही मालिकांचा प्रभाव हा प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Filmfare OTT Awards: टीव्ही मनोरंजन आणि चित्रपट क्षेत्रावर आता ओटीटीचा बोलबाला आहे असे म्हटले जाते. कोरोनाच्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात ओटीटीचा मोठा सहभाग होता. आता तर नवीन प्रदर्शित (Gullak Web Serise) होणारे चित्रपट देखील काही दिवसांनंतर ओटीटीवर येत असल्यानं थिएटरवर त्याचा परिणाम दिसून आला आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात ओटीटी माध्यमानं बदल घडवून आणले आहेत. या प्लॅटफॉर्ममुळे वेगळ्या (Social media news) धाटणीच्या सीरिजमुळे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन झाले आहे. त्यापैकी मालिकांचा प्रभाव हा प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास सेक्रेड गेम्स, द फॅमिली मॅन, मिर्झापूर या मालिकांशिवाय टीव्हीएफच्या एका मालिकेनं प्रेक्षकांना अंतर्मुख केले होते.

टीव्हीएफच्या दर्जेदार आशयांनी परिपुर्ण असलेल्या काही मालिकांचा प्रभाव हा प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ असल्याचे दिसून आले आहे. त्यात कोटा फॅक्टरी, पिचर्स आणि गुल्लक. गुल्लक या मालिकेतून एका मध्यमवर्गीय चौकोनी कुटूंबाची जी गोष्ट सादर करण्यात आली त्यानं प्रेक्षकांच्या हदयाचा ठाव घेतला होता. आता या मालिकेवर कौतूकाचा वर्षाव झाल्याचे दिसून आले आहे. 2021 च्या फिल्मफेअर ओटीटी अॅवॉर्डसमध्ये गुल्लकला 5 पुरस्कार मिळाले आहे. या मालिकेच्या चाहत्यांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर गुल्लकवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. टीव्हीएफची निर्मिती असणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. भारतीय प्रेक्षकांच्या आवडत्या वेबसीरिजमध्ये या मालिकेचा आवर्जुन समावेश केला गेला. यापूर्वी याच निर्मात्यांच्या पंचायत नावाच्या मालिकेनं अशी कामगिरी केली होती. त्या मालिकेला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. पंचायतला बेस्ट कॉमेडी सीरिजचा पुरस्कार मिळाला होता.

गुल्लकमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या वैभव राज गुप्ताला सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे. त्यानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर करुन त्यासंबंधीची माहिती दिली आहे. 2013 पासून माझा टीव्हीएफसोबत प्रवास सुरु झाला. त्या दरम्या अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. त्यात मी खूप आनंदी आणि समाधानी आहे. असे त्यानं म्हटलं आहे. याशिवाय गीतांजली कुलकर्णी (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) यांना पुरस्कार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT