Gully Boy
Gully Boy 
मनोरंजन

'अपना टाइम नही आया'; 'गली बॉय' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

वृत्तसंस्था

मुंबई : रणवीर सिंग आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला 'गली बॉय' हा ब्लॉकबस्टर चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परदेशी विभागात निवडलेल्या अंतिम 10 चित्रपटांमध्ये 'गली बॉय' चित्रपटाचा समावेश नाही.

ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या 'गली बॉय'ची निवड करण्यात आली होती. ऑस्करच्या 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीमध्ये हा चित्रपट निवडला गेला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केलं आहे. स्ट्रीट रॅपरचा संघर्ष यामधून दाखविण्यात आला आहे. मुंबईतल्या धारावीमध्ये राहणाऱ्या मुरादच्या संघर्षाची ही कहाणी आहे. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये रणवीर आणि आलियासोबत विजयराज, कल्की केकला, सिद्धांत चतुर्वेदी, विजय शर्मा आणि अमृता सुभाष ही मंडळी मुख्य भूमिकेत दिसली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 140 कोटींचा गल्ला जमा केला होता.

'बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर करण्यात आला होता. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न (आईएफएफएम) मध्येही 'गली बॉय' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. पण, ऑस्करच्या शर्यतीत हा चित्रपट टिकू शकला नाही. 2001 मध्ये आलेल्या 'लगान' या चित्रपटानंतर एकही भारतीय चित्रपट ऑस्करमध्ये विदेशी चित्रपट विभागात नामांकन मिळवू शकलेला नाही.

ऑस्करसाठी अंतिम 10 चित्रपटांमध्ये फ्रान्सच्या 'लेस मिसरेबल्स', दक्षिण कोरियाच्या 'पॅरासाईट', सेनेगलच्या 'अटलांटिक्स', स्पेनच्या 'पेन अँड ग्लोरी', इस्टोनियाच्या 'ट्रूथ अँड जस्टीस', चेक प्रजासत्ताकच्या 'द पेंटेड बर्ड', हंगेरीच्या 'दोज हू रिमेन्ड', नॉर्थ मॅकोडोनियाच्या 'हनीलँड', पोलंडच्या 'कॉर्पस ख्रिस्ती' आणि रशियाच्या 'बिनपोल' यांचा समावेश आहे. यातून अंतिम फेरीसाठी चित्रपटांची निवड करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT