Tanhaji : 'शंकरा'नंतर तान्हाजी सिनेमाचं 'माय भवानी' गाणं एकदा पाहाच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tanhaji-Maay-Bhavani-Song

पुढील वर्षी 10 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार असून या बहुचर्चित चित्रपटाची कमालीची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Tanhaji : 'शंकरा'नंतर तान्हाजी सिनेमाचं 'माय भवानी' गाणं एकदा पाहाच!

मराठ्यांच्या इतिहासातील गाजलेल्या लढाईपैकी एक असलेल्या कोंढाणा किल्ल्याच्या लढाईवर आधारित 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

गेल्या आठवड्यात 'शंकरा रे शंकरा' हे चित्रपटातील पहिलं गाणं रिलिज करण्यात आलं. त्यानंतर या चित्रपटातील 'माय भवानी' हे दुसरं गाणंही रिलिज करण्यात आलं आहे. अजय आणि काजोल ही रिअल लाईफमधील जोडी रील लाईफमध्ये तानाजी मालुसरे आणि त्यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. माय भवानी या गाण्यामध्ये होळी सण साजरा करतानाचे दृश्य चित्रित करण्यात आले आहे. 

- Happy Birthday Rajinikanth : 'दक्षिणेतील देव' आता दिसणार 'दरबार'मध्ये

माय भवानी हे गाणं सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलं आहे. तानाजी मालुसरे आपल्या साथीदारांसोबत होळी सण साजरा करत आहेत. त्यानंतर तानाजींचा मुलगा रायबाच्या लग्नाची धामधूमही घरी सुरू आहे. अशी पार्श्वभूमी या गाण्याला लाभली आहे. 4 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी हे गाणे पाहिले असून 45 हजारांपेक्षा जास्त जणांनी या गाण्याला लाईक केलं आहे. 

- प्रिया म्हणाली 'आय लव्ह यु मिस्टर कामत', शेअर केले खास फोटो !

'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे, पंकज त्रिपाठी, जगपती बाबू या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. ओम राऊत यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. पुढील वर्षी 10 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार असून या बहुचर्चित चित्रपटाची कमालीची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 

- Street Dancer 3D : डान्सर श्रद्धा आणि वरुणचा पोस्टरमधून लुक आला समोर

टॅग्स :India