vijay varma, Tamannaah Bhatia, gulshan devaiah, vijay - Tamannaah dating  SAKAL
मनोरंजन

Vijay-Tamannaah: 'हृदयी वसंत फुलताना..', विजय-तमन्नाच्या डेटिंग चर्चांवर अभिनेत्यानं केला शिक्कामोर्तब

गेल्या अनेक दिवसांपासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्यातल्या डेटिंगच्या चर्चानं उधाण आलंय.

Devendra Jadhav

Vijay-Tamannaah Dating News Gulshan Devaiah News: गेल्या अनेक दिवसांपासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्यातल्या डेटिंगच्या चर्चानं उधाण आलंय. या दोघांचा खास मित्र गुलशन देवियाहने आता या दोघांच्या नात्याची खुल्लेआम चर्चा केलंय.

गुलशन आणि विजय या दोघांनी नुकतंच सोनाक्षी सिन्हाची भूमिका असलेल्या दहाड या वेबसिरीजमध्ये अभिनय केलाय. यावेळी मुलाखतीदरम्यान गुलशनने विजय - तमन्नाच्या नात्यावर मौन सोडलंय.

(Gulshan Devaiah opens up on Vijay Varma and Tamannaah Bhatia's dating rumours)

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना गुलशनने ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये विजयला चिडवण्याबद्दल सांगितले. विजयने हा विनोद स्पोर्टींगली घेतल्याचा खुलासा त्यांनी केला.

गुलशनने शेअर केले, "होय, मी तमन्ना वर जोक सुरू केला आणि तो व्हायरल झाला. विजयने सुद्धा खिलाडूवृत्तीने तो जोक घेतला. आम्ही मित्र आहोत आणि आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो.

मला त्याला कधीच कमी लेखायचं नाही. मला माहीत होतं की मी त्याला थोडं चिडवू शकतो. पण हा त्याला नक्कीच काही मर्यादा आहेत."

पुढे, विजय आणि तमन्ना हे खरंच एकमेकांसोबत डेटिंग करत आहेत का? असे जेव्हा गुलशनला विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, "मला काही माहिती नाही.

पण त्या दोघांची 'चांगली केमिस्ट्री' आहे. मला कल्पना नाही. विजय जरी चांगला मित्र असला तरी मी तमन्नाला भेटलोही नाही. मी फक्त मीडिया रिपोर्ट्स आणि त्यांचे एकत्र फोटो पाहिले आहेत आणि चिडवायला करायला सुरुवात केली आहे.

पण मी काहीतरी सांगण्याआधी त्याचा चेहरा काहीतरी सांगतो. तो कुछ तो गडबड है. त्यांच्यात खूप चांगली केमिस्ट्री आहे असे दिसते. मला खात्री आहे की यामागे काहीतरी अर्थ आहे." असं गुलशन म्हणाला.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय वर्मा आणि टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या अफेयरची, डेटिंगची चर्चा रंगली आहे.

या दोन्ही सेलिब्रेटींना यावरुन प्रश्न विचारले असता त्यांनी या गोष्टीचा स्विकार केलेला नाही. त्यावर बोलणेही टाळले आहे. अशावेळी सोनाक्षीनं जेव्हा विजयला तमन्नावरुन छेडले तेव्हा त्यानं दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

सोनाक्षीनं विजयला तमन्नाच्या प्रश्नावरुन बोलते केले तेव्हा विजयचा चेहरा भलताच खुलला होता. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य खूप काही सांगून जाणारे होते. त्यानं तमन्नाचे नाव काही घेतले नाही. पण हसणं काही थांबण्याचे नाव घेत नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: नऊ चिमुकल्यांचा मृत्यू पण एकही पोस्टमार्टेम का नाही? कफ सीरप प्रकरणात धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?

Shakti Cyclone: चक्रीवादळ ‘शक्ती’चा तडाखा बसणार! नेमकं काय आहे हे आणि किती घातक असेल? याचं नाव कुणी ठेवलं? वाचा...

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दसऱ्यालाच मिळालं दिवळीचं सुपर गिफ्ट; CM यादवांनी शेतकऱ्यांना दिले 653.34 कोटी

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

SCROLL FOR NEXT