Vijay-Tammana Love Story : 'हो आहे आमचं'! त्याचं हसणं तिच्याविषयी सांगून गेलं!

विजय शर्मा आणि टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या अफेयरची, डेटिंगची चर्चा रंगली आहे.
Vijay Varma Tamannah Bhatiya Love Story Sonakshi
Vijay Varma Tamannah Bhatiya Love Story Sonakshi esakal

Vijay Varma Tamannah Bhatiya Love Story : सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शाह आणि गुलशन देवा यांची मुख्य भूमिका असलेला दहाड नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आगळ्या वेगळ्या विषयाची नव्या प्रकारे मांडणी ही प्रेक्षकांच्या, नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे.

यासगळ्यात दहाडचे प्रमोशनही मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. काही दिवसांपासून अभिनेता विजय शर्मा आणि टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या अफेयरची, डेटिंगची चर्चा रंगली आहे. या दोन्ही सेलिब्रेटींना यावरुन प्रश्न विचारले असता त्यांनी या गोष्टीचा स्विकार केलेला नाही. त्यावर बोलणेही टाळले आहे. अशावेळी सोनाक्षीनं जेव्हा विजयला तमन्नावरुन छेडले तेव्हा त्यानं दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

Also Read : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आता विजयची ती प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे. विजयनं भलेही शब्दांतून त्याच्या भावना व्यक्त केलेल्या नसतील पण त्याच्या चेहऱ्यावरील ते हास्य खूप काही सांगून जाणारे आहे. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यातून असे दिसून येते की, विजय आणि तमन्ना हे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या प्रतिक्रिया तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आल्या आहेत. बऱ्याच दिवसांपासून विजय वर्मा आणि तमन्नाच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे.

Vijay Varma Tamannah Bhatiya Love Story Sonakshi
Salman Khan: 'सलमानच्या चेहऱ्यापेक्षा तर...', साठीच्या जवळ आलेल्या भाईजानचा शर्टलेस फोटो व्हायरल होताच...

सोनाक्षीनं विजयला तमन्नाच्या प्रश्नावरुन बोलते केले तेव्हा विजयचा चेहरा भलताच खुलला होता. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य खूप काही सांगून जाणारे होते. त्यानं तमन्नाचे नाव काही घेतले नाही. पण हसणं काही थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्यावरुन आता नेटकऱ्यांनी अंदाज बांधला की, हे दोन्ही सेलिब्रेटी एकमेकांच्या प्रेमात आहेत.

Vijay Varma Tamannah Bhatiya Love Story Sonakshi
Malaika Arora: वयाच्या 49 व्या वर्षीही मलायकाच्या चेहऱ्याची चमक ; करते हे ३ योगासन

विजय आणि तमन्नाच्या डेटिंगची चर्चा यापूर्वी देखील रंगली होती. नव्या वर्षात गोव्याला या दोन्ही सेलिब्रेटींचे व्हॅकेशन हे साऱ्या चाहत्यांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत होते. तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Vijay Varma Tamannah Bhatiya Love Story Sonakshi
Shrinidhi Shetty: 'तुझ्यावर नेहमीच होतं क्रश'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com