GURU RANDHAVA 
मनोरंजन

मुंबई क्लबमध्ये केलेल्या छापेमारीत गुरु रांधवाला झाली होती अटक, म्हणाला ''नकळत चूक झाली..''

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- मुंबई पोलिसांनी नुकतीच मुंबईतील एका क्लबमध्ये छापेमारी केली ज्यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींना कोविड-१९चे नियमभंग केल्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलं होतं. यामध्ये गायक गुरु रांधवा आणि क्रिकेटर सुरेश रैनासोबत एकुण ३४ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर सगळ्या आरोपींची जामीनावर सुटका झाली. या सगळ्या प्रकरणानंतर गायक गुरु रांधवाने एक स्टेटमेंट सादर केलं आहे ज्यामध्ये त्याने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

पंजाबी गायक गुरु रांधवाच्या वतीने जाहीर केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की, ''गुरु रांधवा सकाळी दिल्लीसाठी निघण्याआधी आदल्या रात्री त्याच्या काही मित्रांसोबत मुंबईमध्ये डिनरसाठी गेला होता. रात्री अचानक झालेल्या या चूकीसाठी तो माफी मागत आहे. दुर्दैवाने स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या रात्रीच्या संचारबंदीविषयी त्याला जराही अंदाज नव्हता मात्र सरकारद्वारे लागू केलेल्या सगळ्या नियमांचा तो आदर करतो. सोबतंच तो वचन देतो की भविष्यात सरकारच्या सगळ्या प्रोटोकॉल्स आणि कोरोनाच्या नियमावलीचं चांगल्याप्रकारे पालन करेल. तो देशाचा एक नागरिक आहे आणि भविष्यात त्याच श्रेणीमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहे.''

गुरु रांधवासोबत सुरेश रैना आणि अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुजैन खानने देखील स्पष्टीकरण देऊन संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे. पंजाबी गायक गुरु रांधवा आणि सुजैन खान क्लबमध्ये येण्याआधी अभिनेत्री करिश्ना तन्नाच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. नुकताच करिश्मा तन्नाने तिचा ३७ वा बर्थ डे सेलिब्रेट केला. या खासदिवशी तिने तिच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं.     

guru randhawa statement arrest in mumbai club raid says was not aware of curfew  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावं : अजित पवार

SCROLL FOR NEXT