Hansal Mehta Stomach Infection:  Esakal
मनोरंजन

Hansal Mehta: हंसल मेहता यांचं बिघडलं पोट ! ट्विट करत महाराष्ट्र सरकारला धरलं धारेवर...

Vaishali Patil

Hansal Mehta Stomach Infection: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता हे त्यांच्या वेगवेगळ्या क्रिएटिव्ह मालिकांसाठी ओळखले जातात. स्कॅम 1992 नंतर काही दिवसांपूर्वी त्यांची स्कूप नावाची मालिका नेटफ्लिक्स प्रदर्शित झाली. ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

ते त्याच्या वेब सिरिजमुळे चर्चेत असतात. त्याच्या बद्दल एक बातमी समोर आली आहे. हंसल मेहता यांना पोटाचं इन्फेक्शन झालं आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली.

मात्र त्याचं ट्विट खुप चर्चेत आलं त्याचं कारण ठरलं ते महाराष्ट्र सरकार. होय, त्यांनी ट्विटमध्ये महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. त्यांना पोटाचा विकार हा मुंबईतील खराब पाण्यामुळे झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप करत त्यांनी रोष व्यक्त केला. महाराष्ट्र सरकार पिण्याचे शुद्ध पाणी देण्यास सक्षम नसल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ते म्हणाले, "आज सकाळी मला पोटात इन्फेक्शन झालं. मी माझ्या फॅमिली डॉक्टरांसोबत बोललो. त्यांनी मला सांगितले की त्यांना दररोज अशी लक्षणे असलेले 10 रुग्ण दिसत आहेत आणि काहींना हॉस्पिटलमध्ये दाखलं केलं जात आहे. आपल्या पिण्याच्या पाण्यात असलेल्या जंतांमुळे हा संसर्ग होत असल्याचं दिसून येत आहे.

पुढे हंसल मेहता लिहितात, 'हे खुपच हास्यास्पद आहे की जे शहर देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे, आर्थिक राजधानी, राज्याची राजधानी आहे, जिथे दोन उपमुख्यमंत्री आहेत, ते आपल्या नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देखील देऊ शकत नाहीत. '

'खराब रस्ते, वाहतूक कोंडी, पूर नियंत्रीत करणाऱ्या व्यवस्थेचा अभाव आणि आपल्या पायाभूत सुविधांची ढासळलेली अवस्था यांबद्दल बोलायला नको. ही मुंबई आहे आणि ही अशा लोकांद्वारे चालवली जाते जे आपल्या नागरिकांबद्दल संवेदनशील नाहीत. त्यांना फक्त सत्ता आणि स्वतःची तिजोरी भरण्याची काळजी आहे. राज्यांची अवस्था लाजिरवाणी आहे.'

इतकच नाही तर त्यांनी यात काही राजकिय नेत्यांनाही टॅग केलं आहे. सध्या हंसल मेहता यांच्या ट्विटची सोशल मिडियावर खुपच चर्चा होत आहे. काही लोक त्यांना पाठिंबा देत आहेत. तर काही लोक त्याच्यावर टिकाही करत आहे. त्याच्या या ट्विट नंतर महाराष्ट्र सरकार कडून काही पाऊले उचलली जातात का? याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT