hanuman makers announce sequel jai hanuman on ram mandir inauguration esakal
मनोरंजन

Hanuman 2 Movie : राम मंदिर प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर 'हनुमान' च्या मेकर्सनं केली मोठी घोषणा!

सध्या बॉक्स ऑफिसवर प्रशांत वर्मा यांच्या हनुमान या चित्रपटाची जोरदार चर्चा असल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

hanuman makers announce sequel jai hanuman on ram mandir inauguration : सध्या बॉक्स ऑफिसवर प्रशांत वर्मा यांच्या हनुमान या चित्रपटाची जोरदार चर्चा असल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटानं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मैं अटल हू या चित्रपटाला मागे टाकून वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आता हनुमानच्या मेकर्सनं एक नवी घोषणा केली आहे. ज्याची चर्चा आहे. बिग बजेट चित्रपटांना मोठं आव्हान देणाऱ्या हनुमानच्या शो ला तरुणाईची गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटानं गेल्या आठवडाभरात दहा कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मेकर्सनं शेयर केलेल्या त्या गोड बातमीनं चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अयोध्येमध्ये काल श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्याला मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटी हजर होते. त्यात साऊथच्या रजनीकांत आणि चिरंजीवी यांनीही हजेरी लावली होती. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं हनुमानच्या मेकर्सनं सिक्वेलची घोषणा केली आहे. १२ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या हनुमाननं बॉक्स ऑफिसवर गरुडझेप घेतल्याचे दिसून आले आहे. मुळ तेलुगू भाषेतील या चित्रपटानं इतर पाच भाषांमध्ये देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंदीमधील हनुमाननं जोरदार कमाई केली आहे.

अवघ्या तीस कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या हनुमानमधील व्हिएफक्सची जोरदार चर्चा आहे. थ्री डी इफेक्टसही चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे. १०० कोटीमध्ये तयार झालेल्या व्हिएफएक्सच्या तोडीचे व्हिएफएक्स हनुमानमध्ये असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. हनुमानचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी पूर्वीदेखील आपल्या या चित्रपटाचा सिक्वेल येणार असे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT