बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयाने रणदीपने चित्रपटसृष्टीत चांगली ओळख निर्माण केली आहे. केवळ टॅलेंटच्या जोरावर रणदीपने मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
20 ऑगस्ट 1976 रोजी हरियाणातील रोहतकमध्ये रणदीप हुड्डाचा जन्म झाला. रणदीप प्रत्येक भुमिका साकारण्यासाठी खूप मेहनत करूनही मागे हटत नाही. मग त्यात वजन कमी करणं असो किंवा बॉडी लँग्वेज बनवणं सगळ्यात तो माहिर आहे.
आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या रणदीपने गेली दोन दशके बॉलीवूडमध्ये सातत्याने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्याने 2001मध्ये त्याने 'मान्सून वेडिंग' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. रणदीपच्या काही खास चित्रपटांवर नजर टाकूया.
सरबजीत
सरबजीत हा चित्रपट रणदीपच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट मानला जातो. 2016 मध्ये आलेल्या या सिनेमासाठी रणदीपने 28 दिवसात 18 किलो वजन कमी केले होते. या चित्रपटातील रणदीपच्या उत्कृष्ट अभिनय आणि समर्पणाबद्दल नेहमीच कौतुक होते.
'हाइवे'
इम्तियाज अलीच्या 'हाइवे' या चित्रपटाने रणदीप हुडाच्या आयुष्याला वेगळचं वळण दिलं आहे. यामध्ये 'महावीर' या ट्रक ड्रायव्हरची भूमिका साकारत त्याने सर्वांनाच चकित केले. 2014 मध्ये आलेल्या या चित्रपटात रणदीप गुन्हेगार होऊनही हिरो बनला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले.
'रंग रसिया'
19 शतकातील लोकप्रिय भारतीय चित्रकार, राजा रविवर्मा यांच्या जीवनावर आधारित, 'रंग रसिया' या चित्रपटात रणदीप हा मुख्य भुमिकेत होता. या भूमिकेसाठी रणदीपने खूप मेहनत घेतली. हा चित्रपटही खूप वादात अडकला मात्र अभिनेता म्हणून रणदीपने या चित्रपटात कमाल केली.
'एक्सट्रॅक्शन'
'एक्सट्रॅक्शन' या चित्रपटातुन त्याने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सॅम हर्ग्रेव्ह दिग्दर्शित या चित्रपटात ख्रिस हेम्सवर्थ या दिग्गज कलाकारासोबत रणदीपनं अभिनय केला. या चित्रपटासाठी त्याला त्याचे केस कापावे लागणार होते त्यामुळे त्याने सुवर्ण मंदिरात जाऊन माफी मागितली आणि मग भूमिकेला होकार दिला.
इन्स्पेक्टर अविनाश
इन्स्पेक्टर अविनाशच्या माध्यमातुन रणदीप हुड्डाने सर्वांची मने जिंकली आहेत. या सिरिजसाठी त्याने खुप मेहनत घेतली. अभिनेत्याने पूर्ण दोन वर्षे त्याच्या फिटनेसवर काम केले. यूपी पोलिसांसारखा गेटअप करण्यासाठी त्याने 18 किलो वजन कमी केलं होतं.
वीर सावरकर
सध्या रणदीप हुड्डा त्याच्या आगामी सिनेमा वीर सावरकरसाठी चर्चेत आहे. यासाठी त्याने त्याने 4 महिने फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध पीले. सावरकरांसारखं दिसण्यासाठी त्याने 26 किलो वजन कमी केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.