rani mukerji  Sakal
मनोरंजन

Rani Mukerji Birthday: वयाच्या 16 व्या वर्षी सलीम खानने राणीला हा चित्रपट केला होता ऑफर, यामुळे तिने दिला नकार

अभिनेत्री राणी मुखर्जी २१ मार्च रोजी ४४ वा वाढदिवस साजरा करत असून तिने वयाच्या सोळाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने, आवाजाने आणि आपल्या सौंदर्याने वर्षानुवर्षे चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री राणी मुखर्जी 21 मार्च रोजी आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. राणीने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत, कधी सून बनून तर कधी पुरुषाची भूमिका करून.

राणी मुखर्जी देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांचे बहुतेक चित्रपट हिट झाले आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

राणीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे राम मुखर्जी आणि कृष्णा मुखर्जी यांच्या घरी झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि अभिनेत्री काजोल हे देखील राणीचे चुलत भाऊ-बहीण आहेत. राणीने चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केले आहे.

दोघांनाही एक मुलगी आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत राणीने चित्रपटांमध्ये खूप प्रयोग केले आहेत. गोड, सुसंस्कृत मुलीपासून ते धाडसी पोलिसापर्यंत, तिने वकिलाच्या भूमिकेतही आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे.

राणी मुखर्जीने 1996 मध्ये 'बियर फूल' या बंगाली चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. मात्र, या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज जरी तिचा आवाज लोकांना आवडत असला तरी एक काळ असा होता की राणीच्या आवाजामुळे चित्रपट निर्माते तिला नाकारायचे.

खुद्द राणी मुखर्जीने एका मुलाखतीत सांगितले की, 'गुलाम'मध्ये आमिर खान, दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि निर्माता मुकेश भट्ट यांना वाटले की तिचा मूळ आवाज या पात्राला शोभत नाही, त्यामुळे या पात्रासाठी आवाज डब करण्यात आला.

1998 मध्ये रिलीज झालेल्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात ट्विंकल खन्नाने टीना मल्होत्राची भूमिका साकारण्यास नकार दिला होता, तेव्हा तीच भूमिका राणी मुखर्जीच्या वाट्याला आली आणि येथून तिच्या करिअरला सुरुवात झाली.

10वीत असताना राणीला सलमानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी पहिला बॉलिवूड चित्रपट ऑफर केला होता. मात्र, तिचे वडील राम मुखर्जी यांनी राणी खूपच लहान असल्याचे सांगत ही ऑफर नाकारली. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव 'आ गले लग जा' होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT