Happy Birthday Rekha: first Kissing scene at the the age of 15..read story Esakal
मनोरंजन

Rekha: आणि अभिनेत्याने जबरदस्ती किस केलं..., असा होता रेखा यांचा पहिला किसिंग सीन

बॉलीवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस. अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षी रेखा यांनी पहिला किसिंग सीन दिलाय.

प्रणाली मोरे

Happy Birthday Rekha: बॉलीवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयातच रेखा यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं होतं आणि बघता बघता त्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. करियर सोबतच खासगी आयुष्यामुळे रेखा या कायमच चर्चेत राहिल्या. रेखा यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या त्यांच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी पसंती दिली. रेखा यांच्या बोल्ड आणि इन्टिमेट सीनने तर अनेकदा प्रेक्षक थक्क झाले. तुम्हाला माहितीय का रेखा यांनी अवघ्या वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा पहिला किसिंग सीन दिलाय. खरंतर या पहिल्या किसिंग सीनचा त्यांचा अनुभव खूपच भयानक होता. या सीनमुळे सिनेमाचं प्रदर्शन तब्बल दहा वर्ष रखडलं होतं.(Happy Birthday Rekha: first Kissing scene at the the age of 15..read story)

रेखा यांच्या जीवनावर आधारित यासिर उस्मान यांच्या 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकांमध्ये त्यांच्या जीवनातील अनेक खाजगी गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे. याच पुस्तकात हा त्यांच्या पहिल्या किसिंग सीनचा किस्सा आहे. 'अंजाना सफर' या सिनेमात रेखा या अभिनेते बिस्वजीत चॅटर्जी यांच्यासोबत काम करत होत्या. सिनेमा दहा वर्षांनंतर 'दो शिकारी' या नावाने प्रदर्शित करण्यात आला. 1969 या सिनेमाचं चित्रकरण सुरू करण्यात आलं होतं. मात्र सिनेमा तब्बल दहा वर्षांनी 1979 सालामध्ये प्रदर्शित करण्यात आला कारण होतं ते म्हणजे या सिनेमातील रेखा आणि बिस्वजीत यांच्यामधील किसिंग सीन.

या सिनेमाच्या वेळी रेखा यांच वय फक्त पंधरा वर्ष होतं. त्या दिवशी रेखा आणि बिस्वजीत यांच्यामध्ये एक रोमँटिक सीन चित्रित होणार होता. त्यासाठी पूर्ण तयारीही झाली होती. कॅमेरा सेट करण्यात आले होते. दिग्दर्शकाने जसं 'ॲक्शन' म्हटलं तसं बिस्वजीत यांनी रेखा यांना मिठीत घेतलं आणि त्यांचं चुंबन घेण्यास सुरुवात केली. या सीनबद्दल रेखा यांना कोणतीच कल्पना नव्हती. तेहतीस वर्षाचे अभिनेते बिस्वजीत हे पंधरा वर्षांच्या रेखाला किस करत होते. दिग्दर्शक जोवर कट बोलत नाही तोवर ते रेखाला किस करत राहिले. पाच मिनिटं त्यांनी रेखा यांच चुंबन घेतलं. सेटवरील क्रू मेंबर्स सिटी आणि टाळ्या वाजवत होते. रेखा यांनी त्यांचे डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि त्या रडत होत्या. या सीन बद्दल रेखा यांना आधी कोणतीच कल्पना न दिल्याने त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता.

सिनेमातील या सीनचं वृत्त आगीप्रमाणे सगळीकडे पसरलं. एका मासिकाने बिस्वजीत आणि रेखा यांचा चुंबन घेतानाचा फोटो आणि किस्सा मासिकात छापला. रेखा यांच्याबद्दल लोक नको त्या चर्चा करू लागले. तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने देखील सिनेमाचं प्रदर्शन थांबवलं. या सीनच्यावेळी रेखा यांचे वय केवळ पंधरा वर्ष असल्याने सेन्सॉर बोर्डाने सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणली. 10 वर्ष सिनेमाचं प्रदर्शन रखडलं. अखेर 1979 सालामध्ये सिनेमा प्रदर्शित झाला.

या सिनेमानंतर रेखा यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सिनेमांमधून बोल्ड आणि इन्टिमेट सीन दिले आहेत. आणि त्यांच्या त्या सीनमुळे अनेकदा वादही रंगले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar: निष्काळजीपणाचा कळस! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् नवजात बाळ तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं,...घटनेनं संताप

Hockey Jersey Controversy: हॉकी संघाच्या भगव्या जर्सीवरून वाद पेटला, अध्यक्षांना अंधारात ठेवून निर्णय घेतला... Email ने उडवली खळबळ; नेमका वाद काय?

'आम्ही एकत्र जेवतो, गप्पा मारतो...' 'सनई चौघडे'मुळे पुन्हा भेटल्या कॉलेजच्या मैत्रिणी; मेघना एरंडेचा खास खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : आईसह दोन लेकींचे मृतदेह सापडले; रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेला दुःखद पूर्णविराम

Valti Bridge Danger: ४० वर्षांपूर्वीचा वळती-मांगीरबाबा पुल वाहतुकीसाठी धोकादायक

SCROLL FOR NEXT