Happy Birthday Shaan: At a young age took responsibility of the family! Today is famous singer
Happy Birthday Shaan: At a young age took responsibility of the family! Today is famous singer sakal
मनोरंजन

Happy Birthday Shaan: शान, लहान वयातच घेतली कुटुंबाची जबाबदारी! आज आहे महागायक

नीलेश अडसूळ

happy birthday shaan: अत्यंत कमी वयात ज्याने सर्वांना वेड लावलं, असा अवलिया म्हणजे गायक शान (Shaan). आज (30 सप्टेंबर) रोजी त्याचा वाढदिवस आहे. शानने आजवर अनेक गाणी गायली. त्याची गाणी गाणी इतकी हीट झाली की लोक आजही ती विसरू शकलेले नाही. पण हा प्रसिद्धी पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अत्यंत कष्ट करून तो इथवर पोहोचला. आज त्याच्या वाढदिवासानिमित्ताने जाणून घेऊया शानविषयी.. (Happy Birthday Shaan: At a young age took responsibility of the family! Today is famous singer)

शानचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला. शान बंगाली कुटुंबातील आहे. त्याचे पूर्ण नाव शंतनू मुखर्जी (Shantanu Mukherjee) आहे. शानला संगीताचा वारसा त्याच्या कुटुंबाकडूनच मिळाला होता. शानचे आजोबा जहर मुखर्जी हे प्रसिद्ध गीतकार होते. तर, त्याचे वडील मानस मुखर्जी संगीत दिग्दर्शक होते. शानने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी गायनाला सुरुवात केली. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू, तेलगू, कन्नड, नेपाळी, उडिया, पंजाबी आणि मल्याळम यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायली.

शान 13 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर, शानच्या आईणए संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. पण शानही मागे हटला नाही. त्यानेही आईसोबत कुटुंबाचा भर उचलला आणि लहान वयातच गाण्याच्या माध्यमातून पैसे मिळवू लागला. सुरुवातीच्या काळात त्याने जाहिरातींसाठी जिंगल्स गायल्या आणि वयाच्या 17व्या वर्षी त्याने पहिल्यांदा चित्रपटासाठी गाणे गायले.

शान केवळ चित्रपटांसाठीच गायला नाही तर त्याने स्वतःचे अल्बमही केले. त्याचे अल्बम बरेच हीट ठरले पण त्याने स्वतः लिहिलेल्या 'भूल जा' आणि 'तन्हा दिल' या गाण्यांमधून त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. ११९९ च्या दरम्यान हीट झालेल्या या गाण्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. पुढे शान केवळ संगीतापुरता मर्यादित राहिला नाही तर,त्याने आपल्यातील टॅलेंट दाखवत अनेक रिएलिटी शोचं सूत्रसंचालनही केलं.

शानने ‘अशोका’, ‘कल हो ना हो’, ‘फना’, ‘जब वी मेट’, ‘तारे जमीन पर’, ‘3 इडियट्स’, ‘ओम शांती ओम’, ‘हे बेबी’, ‘हमको दीवाना कर गये’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘तेरे नाम’ आणि ‘टोटल धमाल’ यासह अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. अत्यंत कमी वयात आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकणारा शान हा बॉलीवूड गायकांमध्ये कायमच वेगळा आणि लोकप्रिय ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT