Happy Birthday Sonali Bendre
Happy Birthday Sonali Bendre 
मनोरंजन

Happy Birthday Sonali Bendre : सुरु होण्याआधीच संपली सोनालीची लव्हस्टोरी; 'या' व्यक्तीवर करायची प्रेम

वृत्तसंस्था

मुंबई : हिंदी अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा आज (ता.०१) वाढदिवस आहे. 2002 मध्ये सोनालीने दिग्दर्शक गोल्डी बहलसोबत लग्न केले. पण, त्याआधी सोनाली एका अभिनेत्याच्या प्रेमात होती. परंतु, सोनाली अखेरपर्यंत हे प्रेम व्यक्त करू शकली नाही आणि सुरु होण्याआधीच सोनालीची लव्हस्टोरी संपली.

90 च्या दशकातील सर्वाधिक सुंदर, प्रतिभावान आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सोनालीने अनेक हिट सिनेमे दिलेले आहेत. पण सोनालीची सुनिल शेट्टी या अभिनत्याने झोप उडविली होती. सोनाली व सुनीलने टक्कर, सपूत, कहर, भाई अशा चित्रपटांत एकत्र काम केले होते. या चित्रपटांच्या सेटवर सोनाली सुनील शेट्टीवर फिदा झाली होती. 

गुडघेदुखीला कंटाळून महिलेची आत्महत्या

मनातल्या मनात ती सुनीलवर प्रेम करू लागली. पण  तिने कधीच या प्रेमाची कबुली दिली नाही. याचे कारण म्हणजे, सुनील विवाहित होता. त्यामुळे सुनीलबद्दलच्या भावना तिने कधीच ओठांवर येऊ दिल्या नाहीत. अर्थात सोनालीच्या डोळ्यांतील प्रेम सुनील जाणून होता. एकदा अभिनेता गोविंदा एका मुलाखतीत सोनाली व सुनीलच्या या अव्यक्त प्रेमाबद्दल बोलला होता. सुनील शेट्टी विवाहित नसता तर त्याने सोनालीबद्दल विचार केला असता, असे गोविंदाने या मुलाखतीत म्हटले होते.

Happy Birthday Vidya Balan : विद्याच्या या भारी जहिराती आठवतायेत का?

ख-या आयुष्यात असे काहीही घडले नाही. हळूहळू सुनील व सोनाली एकमेकांना टाळू लागले आणि ही अव्यक्त लव्हस्टोरी संपली. पुढे सोनालीच्या आयुष्यात गोल्डी आला आणि सोनालीने त्याच्याशी लग्न केले. दोघांनाही रणवीर नावाचा एक मुलगा आहे. सोनाली बेंद्रे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रेमाच्या चर्चाही त्याकाळी खूप रंगल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT