happy birthday when parveen babi accused amitabh bachchan he wants to kill me 
मनोरंजन

''अमिताभ मला मारणार होते'', परवीन बाबीचा होता आरोप 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधील एक प्रसिध्द आणि तितकीच वादग्रस्त अभिनेत्री म्हणून परवीन बाबीचं नाव घ्यावं लागेल. परवीननं बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काही चित्रपट केले होते. त्या दरम्यानच्या अनेक आठवणी परवीन यांनी यापूर्वीही सांगितल्या होत्या. आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एक किस्सा महानायक अमिताभ  बच्चन यांच्याशी संबंधित आहे. परवीन बाबी यांच्या अनेक अभिनेत्याविषयींच्या चर्चा यापूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्या गेल्यानंतरही होत आहे. हा त्यांच्या नावाचा करिष्मा म्हणावा लागेल. जग फिरायची इच्छा असणा-या परवीन यांना त्यांच्या शेवटच्या काळात अनेक मानसिक धक्के सहन करावे लागले होते.

परवीन यांनी अमिताभ यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परवीन यांना प्रेक्षकांक़डून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले. तर काहींकडून टीकाही सहन करावी लागली. तीन वेळा प्रेमात पडलेल्या परवीन यांना शेवटपर्यत खरा जोडीदार काही मिळाला नाही. आज त्यांची बर्थ अॅनिव्हसरी आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या चित्रपट कारकीर्दीचा घेतलेला आढावा. आपल्या ग्लॅमरस असण्यामुळे सर्वांना परिचित असणा-या परवीन यांचा शेवट अतिशय वाईट झाला होता. मात्र त्यांचा फॅन फॉलोअर्सही प्रचंड मोठा आहे. आपल्या अभिनय आणि स्टाईलमुळे त्या युथवर्गामध्ये विशेष लोकप्रिय होत्या. एवढ्या मोठ्या अभिनेत्रीला तिच्या शेवटच्या काळात केवळ एकटेपण आणि निराशाच मिळाली. त्यामुळे त्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं.

डॅनी डेंजोप्पा, कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्याबरोबर त्यांची प्रेमप्रकरणे होती. मात्र त्यांच्याकडून परवीन यांना कायम उपेक्षा सहन करावी लागली. परवीन यांचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी गुजरात मधील जुनागढ येथे झाला. एका मध्यमवर्गीय कुटूंबातून आलेल्या परवीन यांचं शिक्षण अहमदाबाद येथील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झाले. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये बीए केले. त्यानंतर मनोरंजनाच्या क्षेत्रात काही नवीन करावं या उद्देशानं त्यांनी त्यात नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. अमिताभ यांच्यासोबत मजबूर नावाच्या चित्रपटातून त्यांना पहिलं यश मिळालं. बॉलीवूडमध्ये यश मिळालं. ओळख मिळाली.

त्यानंतर अमिताभ बरोबर त्यांनी दीवार, अमर अकबर एंथनी, शान आणि कालिया सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. एकेकाळी त्यांनी अमिताभ यांच्यावर असा आरोप केला होता की, ते मला जीवानिशी मारणार होते. त्यांनी माझ्या मागावर गुंड सोडले होते. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा परवीन बाबी एका मानसिक त्रासातून जात होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. 
 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT