hardeek joshi and akshaya deodhar new movie chatur chor coming soon poster release  sakal
मनोरंजन

लग्नाआधीच हार्दिक-अक्षयाने दिली गुड न्यूज.. थेट लंडनमध्ये जाऊन..

अक्षया-हार्दिकची जोडी 'चतुर चोर'या चित्रपटात झळकणार आहे.

नीलेश अडसूळ

झी मराठी वरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अक्षया देवधर आणि (akshaya deodhar) अभिनेता हार्दिक जोशी (hardeek joshi) सध्या बरेच चर्चेत आहेत. मध्यंतरी त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली देत साखरपुडा उरकला आणि चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली. आता चर्चा आहे ती त्यांच्या लग्नाची त्यामुळे सगळेच त्या क्षणाची वाट पाहत आहेत. मध्यंतरी ते लंडन दौऱ्यावर होते. त्याविषयी बरेच बोलले गेले पण त्याचे कारण आता उघड झाले आहे. दोघांच्याही बाबतीतली एक गुड न्यूज समोर आली आहे. (hardeek joshi and akshaya deodhar new movie chatur chor coming soon poster release)

ती गुड न्यूज म्हणजे आजवर आपल्याला मालिकेतून एकत्र दिसणारे हार्दिक अआणि अक्षया एका चित्रपटातही एकत्र दिसणार आहेत. नुकतीच याबबात घोषणा करण्यात आली आहे. 'चतुर चोर' असं त्यांच्या सिनेमाचं नाव असून नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. सध्या तरी 'चतुर चोर' हा हॉरर कॉमेडी असलेला सिनेमा असल्याची माहिती समोर आली आहे. पण नेमका विषय काय ते अद्यापही उघड झालेलं नाही.

या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतच लंडनमध्ये पार पडल्याचं सांगण्यात येत आहे. किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक हे चित्रपटाचे निर्माते असून, सहनिर्माते म्हणून तबरेज पटेल आणि निनाद भट्टीन हे आहेत. तर अमोल गोळे यांनी या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे. तर चित्रपटाची कथा लेखक सुमित संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. आता या चित्रपटात हार्दिक, अक्षयासोबत इतर कोणते कलाकार असणारम टीझर कधी येणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT