Harry Potter star Leslie Phillips passes away Who Voiced Harry Potter’s Sorting Hat sakal
मनोरंजन

Leslie Phillips: ‘हॅरी पॉटर’मधील ‘सॉर्टिंग हॅट’ला आवाज देणाऱ्या लेस्ली फिलिप्स यांचे निधन

हॅरी पॉटर स्टार लेस्ली फिलिप्स यांनी 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

नीलेश अडसूळ

Leslie Phillips: ‘हॅरी पॉटर’ चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचा आवाज अजरामर झाला असे ‘हॅरी पॉटर’च्या सॉरटिंग हॅटला आवाज देणारे ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स (Leslie Phillips) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

(Harry Potter star Leslie Phillips passes away Who Voiced Harry Potter’s Sorting Hat)

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 'कॅरी ऑन' या सीरिजमधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. तर हॅरी पॉटरमधील (Harry Potter) सॉर्टिंग हॅटला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनानं हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

लेस्ली फिलिप्स ही गेली काही दिवस आजारी होते. त्यांना दोन वेळा हृदय विकाराचा झटकाही येऊन गेला होता. लेस्ली यांचा झोपेत असतानाच मृत्यू झाला अशी माहिती माहिती एजंट जोनाथन लॉयड यांनी दिली.

लेस्ली फिलिप्स यांचा जन्म 20 एप्रिल 1924 रोजी लंडन येथे झाला. कॅरी ऑन सीरिजच्या यशानंतर, लेस्ली फिलिप्स यांनी 'डॉक्टर इन द हाऊस', टॉम्ब रेडर आणि मिडसमर मर्डर्स अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. लेस्ली फिलिप्स यांच्या आयकॉनिक वन लाइनर्सला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. लेस्ली फिलिप्स यांनी 80 वर्षांपेक्षा जास्त काळ मनोरंजन क्षेत्रात काम केले असून 200 हून अधिक चित्रपट केले आहे.

हॉलीवुडसह 'हॅरी पॉटर'च्या संपूर्ण टीमसाठी हा मोठा धक्का आहे. कारण गेल्याच महिन्यात 'हॅरी पॉटर'मध्ये हॅग्रिडची (Hagrid) भूमिका साकारणारे प्रसिद्ध स्कॉटिश अभिनेते रॉबी कोलट्रन यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले होते. त्यांनंतर लगेचच लेस्ली फिलिप्स यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर मोठा दुःखाचा प्रसंग ओढावला आहे. 'हॅरी पॉटर'च्या टीम कडून त्यांना सोशल मिडियावर श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT